Type Here to Get Search Results !

Sahitya Sammelan: 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

akhil bhartiya sahitya sammelan at ammalner - checkmate times

पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर (जळगाव) (Ammalner, Jalgaon) येथे होणार आहे. अंमळनेरला संमेलन आयोजित करण्यावर रविवारी (दि. 23 एप्रिल 2023) शिक्कामोर्तब झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद (Maharashtra Sahitya Parishad) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना आगामी साहित्य संमेलनाचे वेध लागले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आगामी 97 व्या साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले. या संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाला प्राप्त झाली होती.

महामंडळाच्या स्थळनिवड समितीने औदुंबर (Audumbar) आणि अंमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा (Shahupuri Branch) या संस्थेचे दृक-श्राव्य सादरीकरण पाहिले. दोन वर्षांपूर्वी उदगीर येथे साहित्य संमेलन झाले असल्याने आगामी संमेलनासाठी मराठवाड्यातील जालना या स्थळाचा विचार करण्यात आला नाही, असे साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे Sahitya Corporation Executive Dr. Ujjwala Mehendle) यांनी सांगितले. संमेलनाचे अध्यक्ष कोण असतील याचीही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा -

बैठकीस अध्यक्षा डॉ. उषा तांबे (President Dr. Usha Tambe), कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश वंसकर (Vice President Ramesh Vanskar), प्रदीप दाते (Pradeep Date), सुनीताराजे पवार (Sunitaraje Pawar), डॉ. किरण सगर (Dr. Kiran Sagar) आणि डॉ. नरेंद्र पाठक (Dr. Narendra Pathak) या समितीसह प्रकाश पागे (Prakash Page), कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Chairman Prof. Milind Joshi), जे. जे. कुलकर्णी (J. J. Kulkarni), दादा गोरे (Dada Gore), दगडू लोमटे (Dagdu Lomte), डॉ. विद्या देवधर (Dr. Vidya Deodhar), अ. के. आकरे (A. K. Aakare), प्रकाश गर्गे (Prakash Garge) उपस्थित होते.

“साने गुरुजी यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन 50 च्या दशकानंतर पाहिल्यांदाच होत आहे. अंमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकासाची मोठी परंपरा आहे. सर्वांच्या सहकार्याने अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशस्वी होईल.” असे अंमळनेर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी (Ammalner Marathi Literary Board President Dr. Avinash Joshi) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.