Type Here to Get Search Results !

Pune Crime: सव्वा कोटी रुपयांचे दागिने घेऊन कारागीर पसार

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

The artisan ran away with jewelery - checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): गुरुवार पेठेतील (Guruwar Peth) एका सराफी पेढीतील सव्वा कोटी रुपयांचे दागिने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारागिराच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Crime News)

याबाबत सिद्धेश ज्वेलर्सचे मालक कीर्ती चंदूलाल ओसवाल (Kirti Chandulal Oswal, owner of Siddhesh Jewellers) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत सुनील सासमल (Prashant Sunil Sasmal) (वय 40, रा. गणेश पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारागिराचे नाव आहे. त्याने सराफी व्यावसायिक मनोज रमेश ओसवाल (Manoj Ramesh Oswal) यांच्या कुबेर गोल्ड ज्वेलर्समधील (Kuber Gold Jewellers) दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासमल सोन्याचे दागिने घडवून देणारा कारागीर आहे. गेल्या काही वर्षांपासून तो गुरुवार पेठ, रविवार पेठेतील सराफ व्यावसायिकांचे दागिने घडवून देत आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचा त्याच्यावर विश्वास होता.

कीर्ती ओसवाल यांनी 1 कोटी 7 लाख 53 हजारांचे सोने तसेच मनोज ओसवाल यांनी 18 लाख 54 हजारांचे सोने त्याला दागिने घडविण्यासाठी दिले होते. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्याने सराफी व्यावसायिकांकडून सोने घेतले. त्यानंतर तो पसार झाला.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सराफ व्यावसायिक कीर्ती ओसवाल आणि मनेज ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव (Senior PI Sangeeta Yadav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव (Assistant PI Rakesh Jadhav) तपास करत आहेत.

हेही वाचा - Pune Crime: कामवाली बाई कडून घरमालकाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.