Type Here to Get Search Results !

Bjp Pune: खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी भाजपा मध्ये झाल्या प्रवेशकर्त्या

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघातील पुरंदर विधानसभा (Purandar Vidhansabha) मतदार संघात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा (NCP activist in BJP) मध्ये प्रवेश केल्यानंतर आता खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) मतदार संघातील एका जुन्या महिला पदाधिकारी असलेल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खडकवासला महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अश्विनी खाडे (Ashiwini Khade) यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद पटेल (Pralhad Patel) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.

यावेळी बोलताना पुणे जिल्ह्यात येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या बड्या राजकीय नेत्यांचे भाजपतच पक्षप्रवेश होतील, असा गौप्यस्फोट भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे (Jalindar Kamthe) यांनी केला आहे. त्यामुळे आगामी बारामती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी एक एक परिसर, सोसायट्या घेऊन घोंगडी बैठकांचे (Society Meetings) रान उठवले असताना, भाजपा देखील जोरदार तयारी करू लागली (Baramati BJP in Action Mode) असल्याचे समोर येते आहे.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे, माजी नगरसेवक हरिदास चरवड, श्रीकांत जगताप, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे आदी उपस्थित होते. यावेळी अश्विनी खाडे यांनी राष्ट्रवादीला सोडचीट्ठी देत असल्याचे सांगताना, पक्षांमध्ये अनेक गोष्टींची दखल घेतली जात नव्हती. नागरी समस्यांवर विचारलेल्या प्रश्नांची त्याची उत्तरे मिळत नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादी सोडावी लागल्याचे सांगितले. तर देशांमध्ये व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये असल्याने सामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Roll ball: पुण्यात रंगणार रोलबॉलची अंतरराष्ट्रीय स्पर्धा; चंद्रकांत पाटील यांची माहिती

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.