कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 21, 2023
पृथ्वी दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #EarthDay2023 #EarthDay
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): “स्त्रीच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर, त्यागावर प्रेम करायला हवे. भारतीय कुटुंबव्यवस्था कुटुंबवत्सल आणि नात्यांची गुंतागुंत असलेली आहे. या नात्याची घट्ट वीण आणि वात्सल्य दर्शवणारी 'असीमांत रेखा' मनाला भिडते," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Senior writer and former conference president Dr. Shripal Sabnis) यांनी केले.
वेदांत प्रकाशन प्रकाशित व महेश सावळे लिखित ‘असीमांत रेखा’ या पुस्तकाचे प्रकाशन (book Asimant Rekha) डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात (Madhavrao Patwardhan Sabhagruha) झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले (Shrikant Chaougule), प्रकाशिका सुनिताराजे पवार (Publisher Sunitaraje Pawar), लेखक महेश सावळे (Writer Mahesh Sawle), पत्नी रेखा, मुलगा अनुप, स्नुषा डॉ. पारुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,"महात्मा गांधींजींचे सत्य, अहिंसा ही तत्वे सुखी संसाराची बीजे आहेत. प्रेम, विश्वासाने संसार अधिक फुलतो, बहरतो. सावळे दाम्पत्याने हेच सुञ अवलंबल्याने त्यांच्या संसाराचा हा रथ अधिक जोमाने पुढे सरकत आहे. समर्पण, सहनशीलता, प्रेम अशा विविध पैलुंचे दर्शन या पुस्तकात घडते. स्त्री कर्तृत्वाचा आणि सांसारिक वाटचालीचा छत्तीस वर्षाचा हा प्रवास उत्तम पद्धतीने मांडला आहे."
महेश सावळे म्हणाले,"समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. सांसारिक सहजीवनाची छत्तीस वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पत्नीचा वेगळेपणा, तिची आपुलकी, तिचा प्रेमळ सहवास आणि तिच्या अस्तित्वाचा परिघ शब्दबद्ध करण्यासाठी, तसेच पत्नीच्या नात्याप्रती ऋणनिर्देश म्हणून 'असीमांत रेखा' हे पुस्तक रेखाटले."
सुनिताराजे पवार म्हणाल्या,"स्त्रीचे आयुष्य एखाद्या नदीप्रमाणे असते. ती जेव्हा शांत असते, तेव्हा सर्वांना आपुलकीने सामावून घेत तिचा प्रवाह सुरू असतो. माञ जेव्हा ती आक्रमक होते, तेव्हा महापुर येतो आणि संहार होतो. 'असीमांत रेखा' या पुस्तकातून लेखकाने त्यांच्या पत्नीच्या कर्तृत्वाची गौरवगाथा समर्पक शब्दात मांडली आहे. निश्चितच या प्रेरक साहित्यकृतीचे वाचक स्वागत करतील. लोकांना सोपी वाटणारी गृहिणीची भुमिका ही अवघड असते."
हेही वाचा -
श्रीकांत चौगुले म्हणाले,"वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला धरून लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक घरातील कथा वाटावी अशी आहे. पुस्तकातील त्याग, सर्मपणाची भावना प्रेरणा देणारी आहे."
प्रास्ताविक डॉ. पारुल सावळे (Dr. Parul Sawle) यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली अवचरे (Rupali Avachre) यांनी केले. आभार अनुप सावळे (Anup Sawale) यांनी मानले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes