Type Here to Get Search Results !

Pune Crime: नऱ्हे मध्ये हवेत गोळीबार करून वाईन शॉपची रोकड लुटण्याचा प्रयत्न

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Attempt to rob wine shop owner by firing in air in Narhe - checkmate times

पुणे, दि. 24 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वाईन शॉप मालकाच्या हातून पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार (An attempt to snatch bag of money from wine shop owner) दोन अज्ञात लुटारुंनी केला. मात्र कामगार आणि नागरिक जमा झाल्याने हवेत गोळीबार करून लुटारूंनी पलायन केले. (Pune Crime News)

याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय 57, रा. शिवणे, पुणे) (Tukaram Sopan Ingle) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) दोन अज्ञात लुटारूविरोधात तक्रार दिली आहे. ही घटना नऱ्हे (Narhe) येथील नवले हॉस्पिटलच्या (Navale Hospital) पाठीमागील गेट जवळील हिरो वाईन्स (Hero Wines) परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम इंगळे यांच्या मालकीचे नऱ्हे परिसरात हिरो वाईन्स या नावाने वाईन्स शॉप आहे. रविवारी (दि. 23 एप्रिल 2023) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून आपल्या गाडीत बसत असताना धायरी फाट्याच्या दिशेने एका दुचाकीवर अनोळखी दोघेजण आले. त्यावर पुढे बसलेल्या काळया रंगाचा शर्ट घातलेल्या व मागील बाजुस बसलेल्या पांढरा शर्ट घातलेले तरुण दुचाकीवरून खाली उतरले. त्यांनी तक्रारदार यांच्याजवळ येवून त्यांच्या हातात असलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवून मालकाजवळ असलेल्या बॅगेतील दोन लाख एकोणीस हजारांची रोकड हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु इंगळे यांनी ती बॅग घट्ट पकडल्याने त्यांना पैशांची बॅग मिळाली नाही.

हेही वाचा -

दरम्यान दुकानातील कामगार व नागरिक जमा झाल्याने तसेच बॅग न मिळाल्यामुळे या अनोळखी तरुणांनी त्यांच्या हातात असलेले पिस्तुल दहशत (terror) पसरवण्याच्या उद्देशाने हवेच्या दिशेने रोखून त्यातील एक गोळी फायर केली. त्यानंतर ते महाराष्ट्र बँकेच्या (Maharashtra Bank) दिशेने निघून गेले. (Pune Crime News)

याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.