Type Here to Get Search Results !

Baner News: बाणेर मधील ग्रे स्टोन इमारत ठरली असती अनेक निष्पापांच्या मृत्यूच्या मैलाचा दगड

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

baner construction site crane accident - checkmate times

पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): बाणेर येथील सर्वे नंबर 114 मधील 'ग्रे स्टोन' इमारतीच्या बांधकामावरील (Grey Stone Building Construction) क्रेन लगतच्या घरावर पडून अपघात झाला. घराचा पत्रा आणि इमारतीची भिंत यामुळे क्रेन घराच्या छतात अडकल्याने या दुर्घटनेत सुदैवाने जीवीतहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. मात्र, घरामध्ये असलेली दोन लहान मुले व महिला भयभीत झाल्या. तर, यातील एक महिला भीतीने बेशुद्ध पडली. (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या नवव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने काचा बसविण्याचे काम सुरू होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान नवव्या मजल्यावरून क्रेन खाली कोसळून इमारतीलगतच्या घरावर पडली. (Crane fell on the house) यावेळी क्रेन पडल्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजामुळे घरातील लहान मुले व महिला घाबरून बाहेर आल्या. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे एक महिला बेशुद्ध झाली.


इमारतीचे काम सुरू असताना वारंवार अशा प्रकारे सळई, वस्तू घरांवर पडण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु, यावेळी संपूर्ण क्रेनच पडल्यामुळे येथे राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम करीत असताना सुरक्षा नियमांचे योग्य पालन करण्यात आले नाही. योग्य काळजी घेण्यात आली नसल्याने सदर अपघात झाला असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.