Type Here to Get Search Results !

Schools: महाराष्ट्रातील 1 हजार 300 शाळांची झाडाझडती, 800 शाळा बोगस; पुण्यातील 43 शाळांचा समावेश

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

bogus schools in maharashtra - checkmate times

पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): राज्यातील 800 शाळा बोगस (Schools) असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत (Education Department Inspection) समोर आलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीत बोगस असलेल्या या शाळांमधे सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE), आयबी (IB) आणि राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा (State Board of Education Schools) यामध्ये समावेश आहे. 800 पैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत तर इतर शाळांबाबत काय कारवाई करायची? याचा निर्णय शिक्षण विभाग लवकरच घेणार आहे.

राज्यात अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या तब्बल 1300 शाळांची तपासणी शिक्षण विभागाने केली. त्यापैकी 800 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यातील सुमारे 43 शाळा पुण्यातील आहेत. कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे शाळांची सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यात शाळेकडे असणारे ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate - NOC) त्यासोबतच शाळांसाठी लागणारं संबंधित मंडळाचं मान्यता प्रमाणपत्र आणि सरकारकडून देण्यात येणारे संलग्न प्रमाणपत्र या तीन कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

या सगळ्या कागदपत्रांपैकी कोणताही कागद नसल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत तिन्ही कागदपत्र नसणाऱ्या शाळांना बोगस शाळा म्हणू शकतो. अशा एकूण 77 शाळा निदर्शनास आल्या आहेत. 300 शाळांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांकडे शासनाची कोणतीही कागदपत्रे नाहीत, काही शाळांमध्ये फ्रॉड कागदपत्र सापडले आहेत आणि काही शाळांकडे बोर्डाचं संलग्न प्रमाणपत्र नाही, या तीन टप्प्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या शाळांना बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यातील 100 शाळांना दंड केला आहे. 100 शाळांना दररोज 10 हजार रुपये एवढी दंडाची रक्कम आहे.

“प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचं असतं. त्यामुळे अनेक पालक खासगी शाळेत (Private Schools) पाल्याचा प्रवेश घेतात. मोठ्या रकमेची फी भरतात. कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना पालक त्या गोष्टीची बारीकसारीक चौकशी करत असतात. मात्र पाल्यांना ज्या शाळेत शिक्षण देतो त्या शाळेसंदर्भात चौकशी करत नाहीत. त्यामुळे पालकांनी यूआयडी पोर्टलवर जाऊन शाळेचा नोंदणी क्रमांक तपासावा.” असं आवाहन मांढरे यांनी केलं आहे.

संलग्न नसलेल्या 329, मान्यता नसलेल्या 390, इरादा पत्र नसलेल्या 366, बंद केलेल्या 100, दंड केलेल्या 89 शाळांचा समावेश आहे. यातील अनेक शाळा एकाहून अधिक अनियमिततांमध्ये मोडत असून बोगस पद्धतीने चालणाऱ्या शाळांचे प्रमाण 800 असल्याचं आयुक्तांच म्हणणं आहे.

या कारवाईमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेत आहे. मागील काही वर्षातच या शाळा सुरु झाल्या आहे. त्यामुळे त्या त्या परिसरात पर्यायी शाळादेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे. बंद केलेल्या शाळांमधील विद्यार्थांनी जवळच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा - Health Day | वारजे माळवाडीचा उकिरडा होतोय; विद्यार्थ्यांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास, देवाला घेतले आधारास

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.