Type Here to Get Search Results !

BRT Pune: BRT मुळे वाहतुकीची कोंडी; माजी आमदाराची BRT हटवण्याची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

brt should be removed  - checkmate times

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): विश्रांतवाडी-पुणे-नगर महामार्गावरील (Vishrantwadi-pune-nagar Highway) असलेल्या 'बीआरटी'मुळे (BRT) वाहतूक कोंडीचे (Traffic) प्रमाण वाढले आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे (Former MLA Bapusaheb Pathare) यांनी याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन दिले असून यावर तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे शहरात एकीकडे मेट्रोचे (Pune Metro) काम वेगाने सुरू आहे. परंतु, दुसरीकडे शहरात जलद बस वाहतूक योजेनेच्या (BRT) रस्त्यांबाबत कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यात उन्हामुळे आणखीच भर पडत आहे.

वडगावशेरी (vadgaon sheri) येथील बीआरटी मार्ग हटवून हा रस्ता सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी नगरिकांकडून जोर धरत आहे. अपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला बीआरटी मार्ग काढून टाकण्याबाबत पठारे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की,”बीआरटीमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत असल्याने हा मार्ग पूर्णत: हटवावा. अन्यथा, आंदोलन केले जाईल. नागरिकांची होणारी गैरसोय कमी व्हावी, यासाठी मी गेली काही महिने सातत्याने महापालिकेला व वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. पण, त्यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने आंदोलना शिवाय पर्याय राहिलेला नाही.”

तसेच “शहराची वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची खोदकामे, आधीच रस्त्यांची झालेली दुरवस्था हे सर्व घटक वाहतुकीच्या समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. यावर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना आखणे व त्या अंमलात आणणे गरजेचे असताना याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार तीव्र आंदोलन करण्याची तयारी केली आहे, मतदार संघातून हजारो नागरिक यामध्ये सहभागी होतील.” असेही पठारे यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यातील बीआरटी हटवा, बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहनांना प्रवेश द्या; सर्वपक्षीय आमदारांची विधानसभेत मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.