Type Here to Get Search Results !

Pune Crime: पुणे चोरी झालेली मोटार परत मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Shashikant Pawar demanded a bribe as compensation for help case filed - checkmate times

पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): चोरी झालेली एर्टिगा (Ertiga) कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये लाचेची (bribe) मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली होती.

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया

शशिकांत नारायण पवार (Shashikant Narayan Pawar) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पुणे पोलीस आयुक्तालयातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station) येथे नेमणुकीस आहेत. लाचलुचपत विभागाने बुधवारी (दि. 5 एप्रिल 2023) रात्री ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मालकीची मारुती इर्टीगा कार त्यांचा बदली ड्रायव्हर परस्पर घेऊन कर्नाटकमध्ये निघून गेला होता. ही कार परत मिळवण्यासाठी तक्रारदार तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. ती कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून शशिकांत पवार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली.

याप्रकरणी फिर्यादी तरुणाने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रार अर्जाची पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी तक्रारदार तरुणाकडे सुरुवातीला 50 हजार रुपये आणि तडजोडीअंती वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात शशिकांत पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Vijayamala Pawar, Deputy Superintendent of Police, Bribery Division) करत आहेत.

हेही वाचा - १५० रुपयांची लाच मागितली, १०० रुपयांत तडजोड झाली; कारवाई मध्ये १५ हजारांचा दंड झाला, पण कधी ते वाचाल तर हैराण व्हाल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.