Type Here to Get Search Results !

Pune Crime: चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स दुकानात सव्वा किलो सोन्याचा झोल

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

chandukaka and saraf gold stolen by employees - checkmate times

पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वेळोवेळी 35 दागिने लंपास करून 36 वा दागिना गहाळ झाल्याचा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आला अन् चोरीचे (Gold Jewellary Stolen) बिंग फुटले. हा प्रकार पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स (Chandukaka Saraf and Sons) दुकानात घडला. चोरी केल्यानंतर चोर मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचा भास त्याला होत असतो. मात्र, कधी ना कधी हा प्रकार चव्हाट्यावर येतोच. (Pune Crime News)

हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान घडला. तब्बल 1 किलो 246 ग्रॅम म्हणजे 79 लाख 38 हजार 420 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी महिला कर्मचार्‍यासह दोघांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) बेड्या ठोकल्या. त्यांनी या सोन्याचा अपहार करून त्या सोन्यावर एका सोने तारण कंपनीकडून 45 लाखांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत व्यवस्थापक ओंकार तिवारी (29, रा. वृंदावन सोसायटी, चर्‍होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) (Manager Omkar Tiwari) यांनी फिर्याद दिली. कोमल अनिल केदारी (24, रा. नाना पेठ) (Komal Anil Kedari) आणि सागर सूर्यकांत नकाते (32, रा. ससाणेनगर, हडपसर) (Suryakant Nakate) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि सागर हे संबंधित सराफी दुकानात आवक-जावक विभागात नोकरीस होते. त्यांनी येथे नोकरी करताना संगनमत करून पैशाच्या हव्यासापोटी एक एक दागिना करत तब्बल 36 दागिने लंपास केले. मात्र, दागिन्यांची तपासणी करताना त्यांना एक दागिना नसल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी सर्व दागिन्यांची तपासणी केली असता तब्बल 36 दागिने नसल्याचे वास्तव समोर आले. तब्बल 1 किलो 246 ग्रॅम दागिन्यांचा अपहार करत वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी कर्ज काढल्याचा (Gold Loan From Finance Company) प्रकार या निमित्ताने समोर आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. (Pune Crime News)

न्यायालयाने त्यांना 1 मे 2023 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप (API Sarika Jagtap) पुढील तपास करत आहे.

 हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.