कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 8, 2023
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #india #award #civilianaward @mygovindia
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सध्यस्थितीला पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशभरातील राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याला राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना धमक्या येण्यापासून, राजकीय पुढाऱ्यांनी धमक्या देण्यापर्यंत सगळ्याच बाजू जनतेसमोर येताना दिसत आहेत. याबाबत आम्ही घेतलेल्या twitter, youtube, instagram, facebook group, telegram अशा सोशल मिडिया पोलिंग मध्ये, जनतेने ही बाब अधोरेखित केली आहे.
आमच्या फेसबुक वरील निकाल (https://www.facebook.com/checkmatetimes)
आमच्या ट्विटर वरील निकाल (https://twitter.com/checkmate_times)
हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया
साधारणपणे पुण्याचा विचार केला तर काही दिवसांपूर्वीच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून एका बिल्डरकडे 3 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनाही 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील धमकी देऊन खंडणीची मागणी झाली.
तसेच यापूर्वी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलालाही बनावट मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला होता. त्याचप्रमाणे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर लॉरेंस बिश्नोईच्या नावाने शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देण्यात आली होती. तर दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही धमकी आणि तब्बल 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता.
तर काही राजकीय पुढाऱ्यांकडून सामान्य जनतेला धमक्या देण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. या धमक्यांची सगळीच प्रकरणे समोर येत नाहीत, उघडी होत नाहीत. कारण अशा पुढाऱ्यांशी वैर कोण घेणार? कायदा नक्की कोणाला साथ देणार? साम, दाम, दंड आणि भेद अशा प्रकारे सत्तेत आलेल्यांच्या विरोधात आपण कितपत टिकणार या विचाराने सामान्य नागरिक पंगा घेत नाही. मात्र राजकारणात गुन्हेगारी वाढते आहे, अशाप्रकारचे मत सोशल मिडीयावरील जनता व्यक्त करताना दिसते. त्याला कारणीभूत कोण आहे? त्यावर उपाय काय? हे प्रश्न खूप मोठे आहेत. मात्र यावर आळा बसला पाहिजे अशाप्रकारे सामान्य जनता आपल्या भावना व्यक्त करताना दिसते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84