Type Here to Get Search Results !

Checkmate: क्या बोलती है पब्लिक; पुणे शहर लोकसभेची उमेदवारी गिरीश बापट यांच्या कुटुंबात देण्यात यावी का?

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

nominee decision in case of girish bapat - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहराचे एक अभ्यासू नेतृत्व खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर लगेचच या लोकसभेच्या पोटनिवडणूकांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या twitter सह instagram, youtube, telegram आणि facebook group वरून पोलिंग घेतले. यामध्ये बहुतांशी सर्वच ठिकाणी बापट यांच्याच घरातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी असा सूर दिसून येतो आहे.

काही महिन्यांपूर्वी कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत, मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार न देता, हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याची परिणीती सर्वांसमोर आहे. या ठिकाणी कॉंग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) हे महाविकास आघाडीची मोट बांधून विजयी झाले. तर हा कसब्यातील पराभव म्हणजे टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने झालेला पराभव असा निष्कर्ष अनेकांनी मांडला.

हेही वाचा - Pune Crime: ‘आम्ही कोण आहोत माहिती आहे का?’ असे म्हणून गस्तीवरील पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण

त्यामुळे आता संभाव्य पुण्याच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बापट कुटुंबातच उमेदवारी देण्यात यावी असाच काहीसा कल सोशल मिडीयावरील पुणेकरांचा दिसतो आहे. तर दुसरीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणूकीपूर्वीच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे आगामी लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांची तशी तयारी असल्याचे देखील स्पष्टपणे जाणवत होते. तर भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्याकडे देखील त्यांचे समर्थक भावी खासदार म्हणून पाहत असल्याचे त्यांच्या आताच झालेल्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा होर्डींग्ज मधून पुढे आले.

मुरलीधर मोहोळ असतील की जगदीश मुळीक हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मर्जीतील लोकप्रतिनिधी असल्याचे राजकीय अभ्यासक नेहमीच बोलतात. त्याचवेळी मास्तर अर्थात योगेश गोगावले (Yogesh Gogawale) यांचे नाव मागील लोकसभा निवडणुकांमध्ये बापट यांच्याअगोदर सक्षम उमेदवार म्हणून पुढे आले होते. गोगावले यांच्या पुणे शहर अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांमुळे भाजपाने पुणे महानगरपालिकेत प्रचंड मोठी आघाडी मिळवल्याने तेच या उमेदवारीला अधिक योग्य चेहरा असल्याचे बोलले जात होते. मात्र पडद्यामागे घडलेल्या घडामोडींनंतर बापट यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते.

त्याचबरोबर भाजपाचे तेव्हाचे राज्यसभेचे सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) हे देखील तेव्हा इच्छुक होते, ते आताही असू शकतात. त्यामुळे आता पुणे लोकसभेची उमेदवारी देताना भाजपा कशा पद्धतीने विचार करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर पुणेकर नागरिक म्हणून आपलेही मत महत्वाचे आहे. त्यामुळे आपण आपले मत कॉमेंट मध्ये व्यक्त करू शकता. त्याचबरोबर आपण आमच्या या पोलिंग मध्ये अजूनही सहभागी झालेला नसाल तर आपण आमच्या पोलिंग मध्ये याच वृत्तात खाली दिलेल्या लिंक वर थेट क्लिक करून सहभागी होऊ शकता, आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवू शकता.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.