Type Here to Get Search Results !

Pune Crime: गुड टच, बॅड टच मुळे बाललैंगिक अत्याचाराला फुटली वाचा; दोन नराधम शिक्षकांवर गुन्हा दाखल

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

case filed against teachers for child sexual abuse - checkmate times

पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे पोलीस तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने ‘गुड टच, बॅड टच’चा (Good Touch, Bad Touch) उपक्रम सुरू असताना शाळेतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराला (torture) वाचा फुटली. यानिमित्ताने राबविला जात असलेला ‘गुड टॅच, बॅड टच’चा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पिडीत मुलगी ही सध्या 16 वर्षाची असून ती पुण्यातील एका शाळेत शिक्षण घेते. मध्यंतरी कोंढव्यात शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनी बरोबर गैरकृत्य केल्याची घटना घडल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर शाळांमध्ये जनजागृतीपर ‘गुड टच, बॅड टच’च्या अनुषंगाने माहिती देण्याचे काम सुरू होते.

यावेळी एका 16 वर्षाच्या मुलीने आपल्यासोबत देखील गैरकृत्य (Misbehaviour) झाल्याच्या प्रकाराला वाचा फोडली. या प्रकरणात सामाजिक संस्था आणि कोंढवा पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या गुन्ह्यानुसार, पिडीतेच्या ओळखीच्या महिलेच्या भावाने देखील तिचा विनयभंग (Molestation) केल्याच्या प्रकाराची माहिती दिल्याने राहुल गायकवाड (28, रा. वारजे माळवाडी) (Rahul Gaikwad) नावाच्या एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

तर दुसर्‍या गुन्ह्यात पिडीत मुलगी ही 2011 मध्ये एल. के. जीला असल्यापासून ते इयत्ता आठवी पर्यंत तिला दोघांनी वासनेची शिकार बनवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे. या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आहिरे (28, रा. कोंढवा) (Akshay Ahire) आणि सोनु बबन व्हावळे (26) (Sonu Baban Whavele) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तिच्या व आरोपींच्या घरी कोणी नसताना घडला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.