Type Here to Get Search Results !

Chowk Movie: ‘चौक’ चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल, प्रदर्शनाची तारीख घेतली पुढे!

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

chowk marathi movie release date postponed - checkmate times

पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सध्या सोशल मीडियावर ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे अशा 'चौक' या चित्रपटाने (Chowk Marathi Movie) एक विधायक पाऊल उचललं आहे. एप्रिल-मे मध्ये शाळांना सुट्या असल्याने अनेक मराठी चित्रपट या महिन्यांत प्रदर्शित होतात. 5 मे 2023 ला प्रदर्शित होणारा 'बलोच' (Baloch Marathi Movie) आणि 12 मे 2023 ला प्रदर्शित होणारा 'रावरंभा' (Ravrambha Marathi Movie) या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित चौक या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची 12 मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट 19 मे 2023 रोजी प्रदर्शित होईल.

मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टाळावी, यासाठी या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड (Directed by Devendra Arun Gaikwad), निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (Produced by Dilip Lalasaheb Patil) आणि 'चौक'च्या सर्व टीमने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेण्याचे ठरवले.

यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की,“आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची 12 मे ही तारीख बदलून आता 19 मे करण्यात आली आहे. त्यामुळे 19 मे ला हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच बघा.”

तर प्रविण तरडे (Praveen Tarde) म्हणाले की,“इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दया याने त्याचा चौक हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!”

हेही वाचा -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त चौकच्या टीमने केक कापत आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी तारीख पुढे घेण्याची घोषणा केली. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी (Ramesh Pardeshi), स्नेहल तरडे (Snehal tarde), किरण गायकवाड (kiran gaikwad), शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote), चित्रपटाचे मार्केटिंग हेड विनोद सातव (Vinod Satav) व‌ आदी मान्यवर उपस्थित होते. आता ‘चौक’ हा चित्रपट 19 मे 2023 रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.