Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 3 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): चौका-चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) कारवाईने वैतागलेल्या पुणेकरांचा पोलिसांवर वॉच असल्याचे दिसत आहे. ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून वाहतूक नियम मोडणार्या पोलिसांचे फोटो टॅग करून जागरुक पुणेकरांनी ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ म्हणत कारवाई फक्त सामान्य नागरिकांवर का? असा प्रश्न उपस्थित केला. (Pune Police Crime)
नो पार्किंग भागात बुलेट पार्क केली हा (Vehicle parked in no parking zone) फोटो टि्वटरवर टॅग होताच पोलिसांनी ई-चलान फाडून चलानही टि्वट केले. कृषी महाविद्यालय चौकातून (Agriculture College) विरुध्द दिशेने जाणार्या दुचाकी चालविणार्या पोलिसाचा फोटो नागरिकाने टाकला आहे. एका वकिलाने विनाहेल्मेट असलेल्या पोलिसाचा फोटा टि्वट करताना पोलिसाने वर्दी परिधान केली नाही, दुचाकीच्या दोन्ही बाजूला आरसे नाहीत, फक्त गाडीवर पोलिसाचे चिन्ह आहे, असे दाखवून दिले आहे.
पुणे पोलीस टि्वटर वापरण्यात आघाडीवर आहे. कोरोना काळात चांगले काम करणार्या पोलिसांच्या टि्वटर स्टोरी खूपच गाजल्या. पुणे पोलिसांनी जिवाची बाजी लावत नागरिकांसाठी असे काम केले की, त्याची पावती नागरिकांनी तेव्हा पुणे पोलिसांना दिली.
परंतु, हल्ली चोरांसाठी सापळा रचावा तसा सापळा चौका-चौकात लावून पोलीस सामान्य नागरिकांच्या गाड्या तपासत असताना दुसरीकडे पुणेकरही ट्विटर वाहतूक नियम तोडणार्या पोलिसांचे फोटो टॅग करत आहेत. सामान्य नागरिकांनी पोलिसांबरोबरच अन्य नागरिकांच्याही चुका दाखवल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. नागरिकांनीच नागरिकांच्या केलेल्या तक्रारींची तत्परतेने दखल घेतली आहे.
हेही वाचा - 'आमच्याकडे लायसन्स आहे, वेळ वाया घालवू नका!'; असा पुण्यातील वाहतुक पोलिसांना टोमणा
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84