भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 29, 2023
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #firstmetro #metro #india
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे भाड्यात दिली जाणारी सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्ला Justice S. K. Kaul and Justice Ehsanuddin Amanullah) यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. (court rejected railway concession plea for seniors)
न्यायालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे योग्य नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. एम. के. बालकृष्णन यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, वृद्धांना भाड्यात सूट देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, घटनेच्या कलम 32 अन्वये याचिकेनुसार सरकारला आदेश देणे न्यायालयाला योग्य होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्याचा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन सरकारला या विषयावर निर्णय घ्यावा लागेल, असे खंडपीठाने सांगितले आणि यासोबतच न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
कोरोना महामारीच्या (Corona) वेळी 20 मार्च 2020 पासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत रद्द करण्यात आली होती आणि ती अद्याप ती पुन्हा सुरू केलेली नाही. अलीकडेच संसदीय स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांसाठी भाड्यात सवलत देण्याची शिफारस केली आहे. मात्र रेल्वे भाड्यातील सवलत पुन्हा देण्यास सरकार नकार देत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, 2019-20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सूट दिल्यामुळे रेल्वेला 1667 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. ते म्हणाले की, 2019-20 मध्ये रेल्वेला प्रवाशांच्या तिकिटांवर अनुदान म्हणून 59,000 कोटी रुपये खर्च करावे लागले. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सरकार सरासरी 53 टक्के सबसिडी देते आणि ही सबसिडी सर्व प्रवाशांना दिली जात आहे.
कोविड साथीपूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलेली ट्रेन भाडे सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. जस्टिस एस. के. कौल आणि सस्टिस अहसानुद्दीन अमानुल्लाह याच्या पीठाने एम. के. बालाकृष्णन याच्या याचिकेवर सुनावणी केली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
प्रवाशांची ये-जा कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. एका संसदीय स्थायी समितीने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांना महामारी सुरू होण्यापूर्वी दिलेल्या सवलती पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. भारतीय रेल्वे कोरोना महामारीपूर्वी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना भाड्यात 40 टक्के आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 50 टक्के सवलत देत असे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes