Type Here to Get Search Results !

PMC Tax: समाविष्ठ गावातील मिळकतींवर लावलेला तिप्पट कर, एकपट करण्याचे आश्वासन हवेत; माजी विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला सवाल

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc tax to be reduced says deepali dhumal - checkmate times

पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलत (40% Exemption on PMC Property tax) देणार आणि तीनपट टॅक्स (Triple Tax) आकारणी एकपट करणार असे जाहीर केले होते. मात्र त्यातील एकच आश्वासन पूर्ण करून, समाविष्ठ गावांमधील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले असल्याचा घणाघात करत, तो तिप्पट टॅक्स, एकपट करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Ex. Opposition Leader of PMC Pune Dipali Dhumal) यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाने (Council of Ministers) निर्णय घेताना 40 टक्के सवलत बाबत निर्णय घेण्यात आला असून, तीनपट टॅक्स आकारणी बाबत निर्णय झालेला नाही. समाविष्ट गावातील व्यवसाय धारक, छोटे छोटे दुकान धारक यांना तीनपट टॅक्स आकारणी केली असून, ती अन्यायकारक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. विधानसभेत (Maharashtra Vidhansabha) यावर चर्चा देखील झाली होती. मात्र तरीही या समाविष्ठ गावांमधील छोट्या व्यवसाय धारकांना तीनपट टॅक्समध्ये सवलत दिली गेली नसल्याचे धुमाळ यांनी अधोरेखित केले आहे. तरी, तीनपट टॅक्स बाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील धुमाळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे (Govt of Maharashtra) केली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP Pune) मागणीमुळे व पाठपुराव्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ताकरात 40 टक्के सवलत पुन्हा लागू झाली असल्याचा दावा धुमाळ यांनी केला आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                               

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                      

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.