Type Here to Get Search Results !

Pune Crime: पुण्यातील या सरकारी रुग्णालयाचे खाजगीकरण झाल्याचा दुष्परिणाम; आधी पैसे मगच उपचार

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कँटोन्मेट बोर्डाच्या सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयात (Sardar Vallabhbhai Patel Hospital of Cantonment Board) वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय कवडे (Congress Committee General Secretary Sanjay Kawade) यांनी तक्रार केली आहे. पटेल रुग्णालय हे सध्या एका खाजगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. (Pune Crime News)

आधी दहा हजार भरा मगच उपचार असे आय सी यू विभागातील डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल 2023 रोजी पहाटे 5 वाजता 58 वर्षीय सुनंदा मधुकर विकृद (Sunanada Madhukar Vikrud) या महिलेला अस्वस्थ जाणवत असल्याने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयुची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगून त्यांना त्यासाठी दहा हजार रुपये आधी जमा करा, असे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांनी पाच हजार रुपये लगेच तर उर्वरित पाच हजार रुपये नंतर भरतो, असे सांगितले. परंतु, उपचार करायचे असतील तर आधी पैसे भरावेच लागतील असे सांगण्यात आले. (Pune Crime News)


सुमारे अर्ध्या तासानंतर पैशाची जमवाजमवी करून पैसे भरले. त्यावेळी उपचारासाठी साडेचार हजार रुपयांची औषधेही लगेच लिहून देण्यात आले. याचा शारीरिक व मानसिक त्रास मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागला.

सकाळी 5 वाजता दाखल झालेल्या रुग्णाला सकाळी 7 वाजता मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. रुग्णावर वेळीच उपचार सुरू केले असते, तर त्याचे जीव वाचले असते. परंतु आयसीयू चालकांच्या हलगर्जी व आडमुठेपणामुळे महिलेचा जीव गेला असून, यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी कवडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा -

दरम्यान, हे सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाकडून खोडून काढण्यात आले असून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तपासे (Medical officer of the hospital Dr. Tapase) म्हणाल्या की,”रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच नातेवाईकांना पैसे भरण्यासाठी सांगितले होते. त्यांची परिस्थिती जाणून व पैशाअभावी आम्ही उपचार थांबवले नाही, उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.