Type Here to Get Search Results !

Muslim: देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या; सर्वोच्च न्यायलयात मागणी

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

demand to allow muslim woman to pray in masjid accepted by court - checkmate times

पुणे, दि. 15 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मुस्लीम महिलांना (Muslim Woman) मशिदीत जाऊन नमाज (Namaj) पठण करता यावं, यासाठी पुण्यातील एका जोडप्याने मागील वर्षी रमजान महिन्यात (Ramjan) लढा सुरु केला होता. देशभरातील सगळ्या महिलांनाही मशिदीत (Masjid) जाऊन नमाज पठण करु देण्याची मागणी त्यांनी केली.

त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. या लढ्याची दखल घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाज पठणाचा अधिकार असल्याचं मान्य (Muslim women have the right to pray in mosques) करावं लागलं. यामुळे मागील रमजान महिन्यात जिथे महिलांन मज्जाव होता त्याच मशिदीत या रमजान महिन्यात मुस्लीम महिला नमाज पठण करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर शेख (Anwar Shaikh) आणि त्यांची पत्नी फरहान शेख (Farhan Shaikh) अशी त्यांची नवे आहेत. मागील वर्षी रमजानच्या खरेदीसाठी हे जोडपं पुणे कॅम्प (Pune Camp) भागात गेलं होतं. मात्र नमाज अदा करण्याची वेळ जवळ आल्यावर फक्त अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला. फरहान यांना मात्र बाहेर पावसात भिजत उभं राहावं लागलं. त्यानंतर या जोडप्याने ते राहात असलेल्या या बोपोडीतील मशिदीच्या (Bopodi Masjid) व्यवस्थापनाकडे महिलांना मशिदीत प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र त्याला नकार देण्यात आल्याने या जोडप्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हेही वाचा -

त्यावेळी त्या मागणीला नकार देण्यात आला होता. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि देश पातळीवर पोहोचलं. मात्र आता वर्षभरानंतर या मशिदीत मुस्लीम महिलांना नमाज पठणाची परवानगी देण्यात आली आहे. मशिदीत महिलांना नमाज पठण करता यावं यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. या बदलाबाबत या मुस्लीम महिला समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून (Muslim Personal Law Board) सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याने हा बदल पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणं अजून बाकी आहे. तो निकालही महिलांच्या बाजूने येईल आणि देशातील मशिदींमधे मुस्लीम महिलांना मुक्त प्रवेश मिळेल, अशी या महिलांची अपेक्षा आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.