कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-पुण्यातली संभाव्य लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का?उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #byelection #pune— Checkmate Times (@checkmate_times) April 5, 2023
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 5 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भारतात क्रिकेट सामने (Cricket Matches) मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. क्रिकेट सामन्यांमध्ये संघाची लोकप्रियता आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सामन्यांकरिता आवश्यकतेनुसार विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र त्याचे शुल्क ब्रॉडकास्टिंगचे हक्क शुल्काच्या पटीमध्ये वाढलेले दिसत नसून, ते वाढवावेत अशी मागणी पुढे आली आहे.
महाराष्ट्राचा विचार करता, राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई अशी चार आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने असून, त्यावर कसोटी (Test Match), एकदिवसीय (One-Day Match), टी-20 (T-20) आणि आयपीएल (IPL) अशा सर्व प्रकारचे सामने खेळवले जातात. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि भाज्या अशा सर्वच घटकांचे दर वाढत असताना क्रिकेटसाठी मात्र वेगळी सवलत का दिली जात आहे?
बॉम्बस्फोटासारख्या अनेक धोक्यांपासून रक्षण व्हावे, म्हणून क्रिकेट सामन्यांना महाराष्ट्र पोलीस संरक्षण देतात आणि त्याचे शुल्क आकारतात. पण गेल्या 5 वर्षांपासून या शुल्कात वाढ केलेली नाही, असे लक्षात येते. त्यामुळे शासनाने क्रिकेट सामन्यांचे बंदोबस्त शुल्क वाढवावे आणि मिळालेल्या शुल्कातून पोलिसांची घरे दुरुस्त करावीत, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (Hindu Lawyers Council National President Advocate Virendra Ichalkaranjikar) यांनी केली आहे.
हिंदू विधिज्ञ परिषदेने दीड महिन्यापूर्वी सरकारला पत्र लिहून याविषयी मागणी केली होती. या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम वर्ष 2017 मध्ये एका शासन निर्णयाद्वारे, पोलिसांनी क्रिकेट सामान्यांना बंदोबस्त दिल्यास त्याला आकारले जाणारे शुल्क निश्चित केले आहे. त्यानंतर वर्ष 2018 मध्ये सदर शुल्कात केवळ 5 ते 7 लाख एवढी वाढ करण्यात आली. मात्र क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क मात्र त्याच कालावधीत तिप्पट वाढलेले दिसतात.
आयपीएल 2023 - 27 चे ब्रॉडकास्टिंगचे हक्क 44 हजार कोटीहून अधिक रकमेला विकले जात असताना त्याचा लाभ राज्यातील पोलिसांना का मिळू नये? याविषयी शासनाने लवकर लक्ष घालावे, असे या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा -
यात पुढे म्हटले आहे की, 'आयपीएल'सारख्या सामन्यांना सरकार जसे सिगारेट आणि दारू यांवर कर लावते, तसाच कर बंदोबस्तासाठी लावला पाहिजे आणि त्या उत्पन्नातून पोलिसांची घरे दुरुस्त झाली पाहिजेत, अशी मागणीही करण्यात आली होती. परंतु अद्याप क्रिकेट सामन्यांच्या बंदोबस्त शुल्कात वाढ झालेली दिसून येत नाही. पोलिसांनी गणेशोत्सव, दिवाळी, राजकीय कार्यक्रम या सगळ्याला संरक्षण द्यायचेच, पण 'आयपीएल'सारख्या निव्वळ करमणुकीच्या कार्यक्रमालासुद्धा संरक्षण द्यायचे आणि त्यांची घरे मात्र नादुरुस्त आहेत, तसेच त्यांच्या मानसिक ताणामध्येही वाढ झालेली आहे. यामुळे हिंदू विधिज्ञ परिषदेने ही शुल्क निश्चिती पुन्हा व्हावी आणि या जमा होणार्या शुल्कामधून एक ठराविक निधी बाजूला काढून तो पोलिसांच्या घरांसाठी ठेवण्यात यावा.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84