कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 22, 2023
पाहिला जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #WorldBookDay #bookday #WorldBookDay2023
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मंचर बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव (Ambegaon) राष्ट्रवादी काँग्रेसध्ये (NCP) गटबाजी उफाळून आली आहे. बाजार समितीचे सभापती आणि शिरूर लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. (NCP rejected walse Patil's supporter Devdatt Nikam as a market committee candidate)
देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती (Manchar krushi bajar samiti) पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्टवादी काँग्रेस पक्षाने निकम यांची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. देवदत्त निकम यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगून एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाला आव्हान देऊन आंबेगाव तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.
“मी 1990 पासून आतापर्यंत निष्ठेने काम केले आहे. देशातील पहिली डिजिटल बाजार समिती केली. गेली सहा वर्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून देण्यासाठी तसेच शेती मालाला निवारा उपलब्ध होण्यासाठी काम केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत गुरुवारी (दि. 20 एप्रिल 2023) सकाळी चर्चाही केली. त्यांना आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असेही सांगितले होते. त्यांनी तुम्हाला कळवतो, असे सूचित केले. पण नंतर त्यांनी आणि पक्षानेही माझ्याशी संपर्क केला नाही.” अशी भावना देवदत्त निकम यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा -
उमेदवारी नाकारल्यानंतरही “आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे,” असे निकम यांनी जाहीर केले आहे.
ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दुःख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84