Type Here to Get Search Results !

Pune News: 50 हून अधिक लहान मोठ्या नागरिकांचा पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

dog bites more than 50 people - checkmate times

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात पोस्ट कार्यालय (Post Office) आणि चऱ्‍होली (Charholi) रस्त्यावरील पालिका शाळेच्या आवारात पन्नासहून अधिक लहान मोठ्या नागरिकांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा (Dog Biting) घेतला. त्या श्‍वानास रविवारी (दि. 2 एप्रिल 2023) सकाळी पिसाळलेल्या श्वानास पकडून आळंदी पालिकेच्यावतीने (Aalandi Mahapalika) पिंपरी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास (Veterinary Department of Pimpri Municipal Corporation) सुपूर्द केले. (dog bite)

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, शनिवारी (दि. 1 एप्रिल 2023) सकाळपासून या भागात पिसाळलेल्या कुत्र्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. मुख्य रस्त्यावरील गल्ली बोळातील ये-जा करणाऱ्यांचा चावा या श्‍वानाने घेतला.

खंडोबा मंदिर परिसर, पोस्ट कार्यालय, मरकळ रस्ता, तसेच रस्त्याने ये-जा करणारे कोयाळी धानोरे, आळंदीतील लोकांना त्याचा त्रास झाला असून त्यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. त्यातील काही जणांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तर काहींनी ग्रामीण रुग्णालयातून इंजेक्शन (Injection) घेतले.

“आतापर्यंत 27 रुग्णांना लस देण्यात आली आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.” असे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे (Medical Superintendent of Rural Hospital Dr. Urmila Shinde) यांनी सांगितले.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे (Chief Officer Kailas Kendre) म्हणाले,”आळंदी शहर परिसरात एका कुत्र्याने काही नागरिकांचा चावा घेतल्याचे वृत्त रात्री समजले. त्यानंतर नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव यांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास दूरध्वनीद्वारे कळवून श्वानपथकाची मागणी केली. दरम्यानच्या कालावधीत पालिकेच्या आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांमार्फत या श्वानाचा शोध घेतला. परंतु, रात्री या श्‍वानास पकडता आले नाही. रविवारी सकाळी साडेदहा वाजता पिंपरी-चिंचवडच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या श्वानपथकाने आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने श्‍वानास पकडून पुढील उपचारासाठी नेले आहे.”

हेही वाचा - लिफ्टमध्येच कुत्रा चावल्याने मालकीणीविरोधात गुन्हा; कुत्र्यांवरून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.