Type Here to Get Search Results !

Eknath Shinde Threat Call: वारजे माळवाडी मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी; एक जण ताब्यात

                      खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

eknath shinde threat call breaking - checkmate times

पुणे, दि. 11 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना उडवणार आहे, असे म्हणून त्यांनं फोन बंद (CM Eknath Shinde Threat Call) केला. सोमवारी (दि. 10 एप्रिल 2023) रात्री आरोपीने 112 या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली. असा धमकीचा फोन आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी (Pune Police) युध्दपातळीवर तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

राजेश मारूती आगवने (वय 43) (Rajesh Maruti Agawane) असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील धारावी (Dharavi Mumbai) परिसरात राहतो. (CM Eknath Shinde Threat Call)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासास सुरूवात केली. धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी राजेश आगवनेला तात्काळ ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. (CM Eknath Shinde Threat Call)

राजेश मारूती आगवने हा वॉर्डबॉय म्हणून काम करत असून तो मुंबईच्या धारावी परिसरात रहायावस आहे. त्याची पत्नी पुण्यातील कोथरूड परिसरात एका खासगी ठिकाणी काम करते. तिला भेटण्याकरिता तो महिन्यातून 2 वेळा येतो. सोमवारी पत्नीला भेटण्यासाठी आल्यावर त्याला दुखत होते.

छातीत दुखत असल्याने सोमवारी रात्री 12 वाजता राजेशने सर्वप्रथम 112 वर कॉल करून रूग्णवाहिका पाठवा असे कळविले. त्यासाठी नियंत्रण कक्षातून त्याला 108 ला कळवा असे सांगण्यात आले. त्याने दुसर्‍यावेळी त्याच क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Murlidhar Mohol: युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी या नेत्यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.