पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शेवाळेवाडी येथे (Shevalewadi) लग्नकार्य झाल्यानंतर शिल्लक राहिलेले गुलाब जामुन घरी घेऊन जाण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईक आणि केटरर्स चालक यांच्यात हाणामारी झाली. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजीव मंगल कार्यालयात रविवारी लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह सोहळा होता. संजय लोखंडे यांनी हे मंगल कार्यालय बुक केलं होतं. तर जेवणाची व्यवस्था पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापक असलेल्या गुप्ता यांच्याकडे होती.
दरम्यान लग्न कार्य पार पडल्यानंतर सर्व पाहुण्यांचे भोजन झाले. बहुतांश वराडी आपापल्या घरी निघून गेल्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वर पक्षाकडील एक व्यक्ती किचनमध्ये गेली आणि त्याने शिल्लक जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. यावर केटरर्स चालकाने कुठलाही आक्षेप न घेता राहिलेले जेवण डब्यामध्ये भरण्यास सुरुवात केली. वर पक्षाकडील एक व्यक्ती त्या ठिकाणी असणारी गुलाबजामून डब्यात भरू लागला. (Pune Crime News)
हेही वाचा -
त्यावेळी गुप्ता यांनी हे गुलाब जामुन उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केले आहेत तुमचे नाहीत ते घेऊ नका असे सांगितले. याचा राग आल्याने तीन जणांनी गुप्ता यांना हाताने मारहाण (Fight over gulabjamun) केली. तर एकाने लोखंडी झारा गुप्ता यांच्या डोक्यात मारला.
दरम्यान या सर्व गोंधळानंतर गुप्ता यांचे ओळखीचे त्या ठिकाणी आल्यानंतर आरोपी पळून गेले. या संपूर्ण प्रकारानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84