Type Here to Get Search Results !

Cluster School: राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत मध्ये होणार

या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

first cluster school in maharashtra in panshet - checkmate times

पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): राज्यातील कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु करताच, या संभाव्य निर्णयाला कडाडून विरोध करण्याची भूमिका शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी जाहीर केली होती. परंतु, कमी पटाच्या शाळा बंदही करायचा आणि त्या बंद होण्यापूर्वीच त्यांना विरोध होऊ नये, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक चांगला पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद नव्हे, तर त्यांचे एकत्रीकरण करायचे, असा हा नवा पर्याय आहे. यालाच क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नाव दिले आहे. (ZP Cluster School)

झेडपीची राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) (Panshet, Velhe) येथे साकारत आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असणार आहे. यासाठी पानशेत व पानशेतच्या परिसरातील किमान 20 च्या आत पटसंख्या असलेल्या 16 जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळेसाठी पानशेतमध्ये मोठी इमारत उभारण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2023) ही शाळा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसोबत शिक्षण घेण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठीही मदत होणार आहे.

झेडपी शाळांची सद्यःस्थिती

·   झेडपीच्या एकूण शाळा – 3716

•   वीसच्या आत पटसंख्येच्या शाळा - 1054

•   वीसच्या आत पटसंख्येच्या शाळांतील एकूण विद्यार्थी - 12898

•   वीसच्या आत पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांची संख्या - 1964

•   पानशेतच्या क्लस्टर स्कूलमधील संभाव्य विद्यार्थी संख्या - 154

सध्या या शाळांमधील पटसंख्या खुपच कमी असल्याने दोन शिक्षकांच्या नियुक्तीवर शाळा चालवली जाते. परिणामी एकाच वर्गखोलीत विविध वर्गातील विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत. पानशेतमध्ये उभारण्यात आलेल्या या क्लस्टर स्कूलमध्ये मात्र आता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण घेता येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) अद्ययावत अशी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सध्या या 16 शाळांमध्ये मिळून एकूण 37 शिक्षक कार्यरत आहेत. शाळा एकत्रीकरणातून आता केवळ 9 शिक्षकांची गरज भासणार आहे. परंतु विविध विषयांचे तज्ज्ञ असलेल्या 12 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

क्लस्टर स्कूलसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रत्येक वर्गात संगणक, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रयोगशाळा व एक ई वर्गखोली तयार कऱण्यात आलेली आहे. इमारतीत आणखी चार खोल्या असणार आहेत. अशी एकूण 12 वर्गखोल्यांची ही नवी शाळा असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी सांगितले.

हेही वाचा -

आजूबाजूच्या गावातून शाळेत येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारी निधीच्या माध्यमातून बसची सोय उपलब्ध करून देणारी पानशेत ही राज्यातील एकमेव शाळा ठरणार आहे. यासाठी फोर्स मोटर्सने दोन बस दिल्या असून त्यातील एक बस जिल्हा परिषदेच्या मालकीची असेल, तर दुसरी बस स्थानिक चालकाला चालविण्यासाठी दिली जाणार आहे. दरम्यान, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापावे लागत असल्यास, अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून प्रतिवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणारे अनुदान आता या बसचालकाला प्रत्येक विद्यार्थ्यांपोटी दिले जाणार आहे.

“क्लस्टर स्कूलचा सुरवातीला पालकांसह शिक्षकांचाही विरोध होता. परंतु, याचे फायदे समजाऊन सांगितल्यानंतर सर्वांनी एकमताने सहमती दिली. त्यानुसार 12 वर्गखोल्यांची ही नवी इमारत उभारण्याचे ठरले. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवरच ही नवीन शाळा इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांचा निधी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध करून दिला आहे.” असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.