Type Here to Get Search Results !

Pune Crime: खडकवासल्यात गुन्हेगारी वाढतेय; सरकारी अधिकाऱ्याचे अपहरण

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

gramsevak khade kidnapping and extortion case - checkmate times

पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): ‘तू पाच लाख रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास करतो,’ अशी धमकी देत हवेली तालुक्यातील कूडजे गावाच्या (Kudje, Havei Taluka) ग्रामसेवकाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला डांबून ठेवत खंडणी उकळल्या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल (Extortion) करण्यात आला आहे. (Pune Crime News)

ग्रामसेवक खाडे यांनी याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनला (Uttamnagar Police Station) विकास प्रकाश गायकवाड (Vikas Prakash Gaikwad) व इतर दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोर व्हिलर गाडी क्रमांक MH12/vc/7576 मधून जात असताना नटराज हॉटेल जवळ आले. त्यांच्या गाडीच्या समोरील बाजूस एक दुचाकी गाडी आली. त्यावर दोन अनोळखी इसम बसलेले होते. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने एक मोकळी बीयरची बाटली गाडीसमोर फोडली. दोन्ही इसम फिर्यादीच्या गाडीपाशी आले. त्यांनी विचारले की,’हॉर्न का वाजविला?’ असे सांगून वाद घालत असताना कुडजे गावामध्ये राहणारे विकास गायकवाड हे तेथे आले आणि त्यांनी त्या अनोळखी इसमांना सांगितले की,’अरे भाऊसाहेब आपल्या येथील आहेत, त्यांना तुम्ही काही बोलू नका, आपण सरपंच समीर पायगुडे यांच्या हॉटेलवर जाऊन विषय मिटवू.’

त्यानंतर तो म्हणाला की,’मी तुमची गाडी चालवितो तुम्ही शेजारी बसा.’ ग्रामसेवक विकास गायकवाड यांना शेजारी बसवले तेव्हा त्याने हातातील मोबाईल काढून घेतला. तसेच दुचाकीवरील दोन्ही लोक गाडीत मागील सीटवर बसले आणि आरोपी विकास गायकवाड याने गाडी वळवून घेतली आणि गाडी जिल्हा परिषद शाळा कुडजेचे जवळ असलेल्या दगडे फार्म हाऊस येथे नेऊन थांबविली. तेव्हा ग्रामसेवक यांनी विकासला गाडी येथे का आणली? असे विचारले असता आपण येथे बसून मिटवून घेऊ असे म्हणून त्याने गाडीतून उतरुन त्याचेकडील चावीने दगडे फार्मचा दरवाजा उघडला.

आरोपी विकास गायकवाड याने सांगितले की,’मी तुमच्यावर गेले दीड महिन्यापासून पाळत ठेवत आहे. तुम्ही कुठे जाता, कोठून घरी जाता, कसे येता यावर मी लक्ष ठेऊन आहे. तुम्हांला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही मला पाच पेटी द्यायचे आणि तुम्ही पैश्याची जमवा जमव करा नाहीतर तुमचा विषय येथेच संपवून टाकतो, तुमची शेवटची इच्छा काय ते सांगा?’ असे म्हणाला. (Pune Crime News)

ग्रामसेवक यांनी त्यांची खूप विनवणी करित होते. पण ते ऐकत नव्हते. त्यादरम्यान ते दोन अनोळखी इसम तेथून खाली गेले व काही वेळाने परत आले, त्यांचे हातात वडापाव होते. त्यांनी वडापाव गामसेवकाला जबरदस्तीने खाण्यास दिले. मग तेथे असलेल्या दोरीने त्या तिघांनी मिळून ग्रामसेवकांचे दोन्ही हात व दोन्ही पाय बांधले व तेथेच असलेल्या सोफ्यावर झोपविले आणि एक दोरी गळ्याला बांधुन ती एका लोखंडी अँगलला बांधुन डांबून ठेवले होते. विकास गायकवाड याने,‘तुम्ही जर येथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला तर बाहेर माझे आणखी लोक थांबले आहेत. ते तुम्हाला मारतील,’ असे सांगितले.

हेही वाचा -

त्यानंतर आरोपी विकास याने खिशातून एक छोटी प्लॅस्टिकची बाटली काढली व म्हणाला की,’यात एकदम जहाल विष आहे, ते पिल्यावर तुमचा खेळ खलास होईल. तुम्ही तुमच्या हाताने ते प्या,’ आणि फिर्यादी ग्रामसेवक याला मृत्यूची भीती दाखवून ‘तुमच्याकडे फोन पे मध्ये किती पैसे आहेत?’ अशी विचारणा करुन फोन पेचा पासवर्ड जबरदस्तीने विचारुन घेतला आणि फोन पेचा वापर करुन त्याने खात्यात असलेली 49,000 रुपयांची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करून घेतली. इतरही पैसे उकळले. (Pune Crime News)

घडलेल्या प्रकरणानंतर फिर्यादी ग्रामसेवक यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विकास प्रकाश गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर संघटीत गुन्हेगारी (मोका) अंतर्गत करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ (District President of Pune District Gram Sevak Sangathan Shrikant Vaval) यांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.