Type Here to Get Search Results !

Pune News: शिक्षणाच्या माहेर घरात चाललंय काय?; पडायला आलेल्या इमारतीत विद्यार्थी गिरवत आहेत भविष्याचे धडे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Nimbalkarwadi schoo,in bad condition - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शिक्षणाच्या माहेरघर असलेल्या पुण्यात एका पडायला आलेल्या इमारतीत विद्यार्थी भविष्याचे धडे गिरवताना दिसत आहेत. ही परिस्थिती आहे गुजर-निंबाळकरवाडीतील (Gujar- Nimabalkarwadi) जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची (ZP School Building). मागील 4 वर्षापासून या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण सुरु आहे.

ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल (Building Report) 2018-19 मध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीला (Panchayat Samiti) देण्यात आला. मात्र, तेव्हापासून केवळ वेळकाढूपणाची भूमिका दोन्ही प्रशासनाने घेतली आहे. ही शाळा दुमजली असून पहिल्या मजल्यावर तीन तर दुसऱ्या मजल्यावर दोन वर्गखोल्या आहेत. यामधील दुसऱ्या मजल्यावरील खोल्या जीर्ण अवस्थेत असून मुले खेळताना इमारत कंपन पावते. त्यामुळे ही संपूर्ण इमारत पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी तो प्रत्यक्षात मात्र उतरवलेला नाही.

ग्रामस्थ इमारत स्वखर्चातून पाडण्यास तयार आहेत. मात्र, पुन्हा शाळा कुठे भरवायची हा प्रश्न अनुत्तरित असल्याने इमारत पाडता येत नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असून ही शाळा कोणत्या परिस्थितीत उभी आहे याची कल्पनाही अधिकाऱ्यांना नाही. केवळ वेळकाढू भूमिका घेत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

सद्यस्थितीत दुसऱ्या मजल्यावरील दोन वर्गखोल्यात शाळा न भरविता दोन सत्रांमध्ये खालच्या तीन वर्गात शाळा भरविण्यात येते. मात्र, त्यामुळे धोका टळलेला नसून तो वाढला आहे. कारण, दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोल्याच्या भिंतीचा कोणताही भाग कोसळून विद्यार्थ्यांना जखम होऊ शकते.


अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार शाळेकडून इमारतीचा अहवाल तयार करण्यात आला असून सर्व अहवाल सादर केल्यानंतर संपूर्ण शाळा पाडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने निधी नसल्याचे कारण देत इमारत पाडण्यास असमर्थता दर्शविली आहे. दुसरीकडे बसण्याची व्यवस्था न करता त्या शाळेच्या इमारतीत शाळा न भरविण्याचा आदेशही पंचायत समितीने काढण्याचे काम केले.

तपशील

•    शाळेचे बांधकाम - 2005

•    वरील दोन वर्गखोल्याचे काम – 2007

•    शाळेचा एकूण पट – 87 विद्यार्थी

•    एकूण वर्ग खोल्या - 5

•    अतिधोकादायक खोल्या – 2

•    शिक्षक संख्या - 5

•    वर्ग - पहिली ते सातवी

•    सद्स्थिती - अनेक ठिकाणी भिंतीला तडे, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण


याबाबत गुजर-निंबाळकरवाडीचे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे म्हणाले कि,”गावांचा समावेश महापालिकेत होण्यापूर्वी सातत्याने नव्याने इमारत करण्यासंबंधी आम्ही पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने याला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. आता महापालिकेत समावेश झाला असला तरी शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी आमची अवस्था झाली आहे.”

तर याबाबत विविश अधिकारी व समितींचे अध्यक्ष काय म्हणाले तेही पाहूयात -

मीनाक्षी राऊत, पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी –

(Meenakshi Raut, Administrative Officer, Education Department, Pune Municipal Corporation)

“नव्याने समाविष्ट गावातील कोणतीही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यावर आम्हाला कोणतीही कार्यवाही करता येत नाही.”

हेही वाचा - Shirur News: पुणे जिल्ह्यातील या मोठ्या 24 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर; कधीही लागू शकते कुलूप?

आयुष प्रसाद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी –

(Ayush Prasad, Chief Executive Officer, Pune Zilla Parishad)

“धोकादायक इमारतीत शाळा भरविण्यात येत असल्याची कल्पना मला नव्हती. याबाबतीत सविस्तर माहिती घेऊन अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.”


लहू खोपडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष –

(Lahu Khopde, Chairman, School Management Committee)

मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. मुलांना शाळेत पाठवताना भिती वाटते. एखादा खडा जरी डोक्यात पडला तरी मोठी जखम होईल. प्रशासन चार वर्षापासून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न पडतो.


नीलिमा म्हेत्रे, हवेली पंचायत समितीचेच्या गट शिक्षणधिकारी –

(Neelima Mhetre, Group Education Officer of Haveli Panchayat Samiti)

शाळेमध्ये पाच वर्गखोल्या अन् पाच शिक्षक असून त्यातील दोन वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गखोल्यांमध्ये दोन सत्रात शाळा भरविण्यात येत आहे. आगामी काळात महापालिकेशी समन्वय साधून इमारतीतबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा - Ramnagar: रामनगर झोपडपट्टी मध्ये कुटुंब आणि समाज सबलीकरणाचा प्रयोग रंगतोय; चार वर्षांपासून यशस्वी होतोय

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.