Type Here to Get Search Results !

Hadapsar Terminal: हडपसर टर्मिनलवरील दोन स्टेबलिंग लाइनचा विस्तार; होणार गाड्यांच्या संख्येत वाढ

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Increase in number of trains at Hadapsar terminal - checkmate times

पुणे, दि. 15 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): रेल्वे प्रशासन हडपसर टर्मिनलचा (Railway Administration Hadapsar Terminal) विकास करताना स्थानकावरील दोन स्टेबलिंग लाइनचा विस्तार थेट घोरपडी कोचिंग डेपोपर्यंत (Ghorpade Coaching Depot) करणार आहे. त्यामुळे येत्या काळात हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. शिवाय गाडी दुरुस्तीसाठी पुणे स्थानकावर न जाता थेट घोरपडी यार्डमध्ये जाता येणार आहे. पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनलच्या विकासावर भर दिला आहे.

हडपसर हून रेल्वे वाहतूक वाढविण्यासाठी प्रवासी सुविधा वाढविण्यासोबतच स्टेबलिंग लाइन, पिट लाइन, लूप लाइन (Stabiling line, pit line, loop line) आदीसारख्या पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन स्टेबलिंग लाइनचा विस्तार करण्याचे ठरविले आहे.

रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी त्या स्थानकावर स्टेबलिंग लाइन व पिट लाइनची आवश्यकता असते. पिट लाइनवर रेल्वे डब्याची देखभाल व दुरुस्ती होते. तर स्टेबलिंग लाइन वर रेक ठेवला जातो. सोप्या शब्दांत रेकचे पार्किंग. स्टेबलिंग लाइन नसेल तर रेल्वे गाड्या रनिंग लाइन वर ठेवले जाते. त्यामुळे रनिंग लाइन ब्लॉक होऊन जाते. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे प्रमुख स्थानकावर स्टेबलिंग लाइन तयार केली जातात.

हेही वाचा -

सध्या घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्पलेक्स (Ghorpadi Coach Maintenance Complex - GCMC) येथे पाच स्टेबलिंग लाइन व पाच पीट लाइन तयार केल्या आहेत. ज्या रेल्वेगाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स पुण्याकडे आहे, त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम जेसीएमसी येथे केले जाते. हडपसर टर्मिनल येथे तयार करण्यात येणारे दोन स्टेबलिंग लाइनची लांबी सुमारे 590 मीटरची आहे. यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मागील दीड वर्षापासून विविध कामे टर्मिनलवर केली जात आहेत. हडपसर टर्मिनलसाठी सुमारे 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पैकी 40 कोटीचे काम झाले आहे.

याबाबत वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला (Senior Divisional Operations Manager Dr. Swapneel Neela) म्हणाल्या कि,”हडपसर रेल्वे स्थानकावरून येत्या काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या स्टेबलिंग लाइनचा विस्तार केला जाईल. त्यामुळे रेक ठेवण्याचा प्रश्न मिटेल. त्यासाठी रेकला पुणे स्थानकावर आणण्याची आवश्यकता भासणार नाही.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.