Type Here to Get Search Results !

लोकमत पत्रकाराच्या समयसूचकतेतून, हेल्प रायडर्सच्या प्रयत्नांमुळे महिलेला मिळाला आसरा

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

help riders rescue woman - checkmate times

पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): “वारजे मधील माई मंगेशकर हाँस्पिटल (Mai Mangeshkar Hospital, Warje, Pune) समोरील पुलावर, कात्रजकडून चांदणी चौकाच्या (Katraj Chandani Chowk Bypass) दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एक जेष्ठ महिला मागील दोन-तीन दिवसांपासून बसुन आहे. चौकशी केली, ती बाई काहीच बोलत नाही. संबंधित विभाग अथवा वारजे पोलिसांनी (Warje Police) याची चौकशी करावी, महिलेस सुखरूप ठिकाणी पोहचण्यासाठी सहकार्य करावे”, अशा प्रकारचा सोशल मिडिया संदेश दैनिक लोकमतचे पत्रकार बजरंग लोहार (Lokmat Reporter Bajarang Lohar) यांनी रात्री 11 च्या सुमारास सोशल मिडीया (Social Media) वर पोस्ट केला.

त्यानंतर “एक जीव वाचवण्याची चळवळ” म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेल्या हेल्प रायडर्स (Help Riders) या संस्थेचे संस्थापक प्रशांत कनोजिया (Prashant Kanojiya) यांच्या निदर्शनास ही पोस्ट आली. यावेळी कनोजिया यांनी क्षणाचाही विलंब न लावता, हेल्प रायडर ग्रुप वर फॉरवर्ड केली. ही पोस्ट होताच हेल्प रायडर्सचे बाळासाहेब ढमाले (Balasaheb Dhamale) यांनी त्यांच्या मुलीसह त्या अज्ञात महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी स्वत: पत्रकार बजरंग लोहार, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई धनंजय देशमुख, राजू शेख, संतोष पवार यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित होते.

ती ज्येष्ठ महिला हिंदी भाषिक होती. तिला काहीही माहिती सांगता येत नव्हते. ही समस्या ओळखून क्षणाचाही विलंब न लावता हेल्प रायडर्सने स्वामी निवास वृध्द आश्रम पौडच्या (Swami Niwas Vruddhashram Paud) गौरी धुमाळ (Gauri Dhumal) यांनाही घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर रात्री 1 वाजता हेल्प रायडर परिवारातील श्री गजानन महाराज ॲम्बुलन्स सर्व्हिसचे (Shree Gajanan Maharaj Ambulance) गोपाल जांबे (Gopal Jambe) यांच्या रुग्णवाहिकेतून विनाशुल्क त्या महिलेला वारजे मधून पौड येथील वृद्धाश्रमात हलवण्यात आले. एकूणच ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार बजरंग लोहार यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि हेल्प रायडर्स’सह वारजे पोलिसांच्या मदतीमुळे एक जेष्ठ महिलेचा जीव वाचला असून, ती आता सुरक्षीत ठिकाणी पोचली. या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. चेकमेट टाईम्स या सर्व सेवावृत्ती असलेल्या देशवासियांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. (We Salute to Dedication)

हेही वाचा - पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना हेल्प रायडर्सची हेल्प; वडापाव, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.