Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 3 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): आठवड्याभरापूर्वी माहेरी गेलेल्या पत्नीनं तिथेच आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पतीनेदेखील राहत्या घरी आत्महत्या (Husband Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नसून राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) याची नोंद करण्यात आली आहे.
भोर तालुक्यातील (Bhor) केळवडे गावात (Kelwade) ही घटना घडली आहे. धीरज कोंडे (Dheeraj Konde) आणि समृद्धी धीरज कोंडे (Samruddhi Dheeraj konde) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावं आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. भोर तालुक्यातील केळवडे येथे राहणारी समृद्धी ही मुळशी तालुक्यातील पिरंगुट (Pirangut, Mulshi) येथे 28 मार्च 2023 रोजी मावशीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. तिथेच तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनाचा धक्का धीरजला सहन झाला नाही. त्यानं 30 मार्च 2023 ला राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. धीरज आणि समृद्धी यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वीच झाला होता. समृद्धीनं आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट असतानाचा पतीनंदेखील स्वतःला संपवलं. धीरजनं नैराश्यातून (Depression) आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - वा रे कलियुग; घरच्या कारभाऱ्याला दोन मुलांनी संपवले, कपाळाचे कुंकू पुसून पत्नीने केला पुरावा नष्ट
समृद्धीच्या मृत्यूची नोंद पिरंगुट पोलीस ठाण्यात (Pirangut Police Station) करण्यात आली आहे. तर धीरजच्या आत्महत्येची नोंद राजगड पोलिसात (Rajgad Police) करण्यात आली आहे. दुहेरी आत्महत्येची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. नवदाम्पत्याने अचानक आत्महत्या केल्यानं त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84