कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 7, 2023
भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार कधी झाला?
त्याचे उद्दिष्ट काय होते हे कमेंट करा.
उत्तर उद्या सकाळी 9वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #Nehru #Pakistan #india
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वडगाव शेरी मतदार संघाचे (Vadgaon Sheri Vidhansabha) आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingare) यांनी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण (Symbolic Hunger Strike) म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल, असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik President of BJP Pune) यांनी लगावला.
मुळीक म्हणाले,”वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे (Pune Metro) काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे (Bhama Askhed Water Project) या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे (24 X 7 Water Supply Scheme) कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे. वडगाव शेरीच्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते (PPP Model Roads in Pune) निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी (Nagar Road Traffic) कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल (Golf Club Fly Over) बांधण्यात आला आहे.”
त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल (Kharadi Shirur Fly Over) निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण (Expansion of Pune Airport) आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुळीक यांनी म्हटले आहे. तर मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे, या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली असल्याचा आरोप जगदीश मुळीक यांनी केला आहे.
मुळीक पुढे म्हणाले,”राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरी मधील मोठ्या प्रकल्पांसाठी “शून्य” भोपळा निधी (Zero Budget) मिळाला. आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करतात आणि त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. वडगाव शेरीच्या गेल्या काही वर्षातील विकासात टिंगरे यांचे “शून्य” योगदान आहे. हे अपयश लपविण्यासाठी ते स्टंटबाजी करतात हे जनतेला माहिती असून त्याचे योग्य उत्तर मतपेटीद्वारे मिळेल,” असा विश्वासही मुळीक यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare), माजी नगरसेवक योगेश मुळीक (Yogesh Mulik), संतोष खांदवे (Santosh Khandave), अर्जुन जगताप (Arjun Jagtap), राजू बाफना (Raju Bafna), विजय चौगुले (Vijay Chougule) आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पुण्यातील बीआरटी हटवा, बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहनांना प्रवेश द्या; सर्वपक्षीय आमदारांची विधानसभेत मागणी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84