Type Here to Get Search Results !

Jio Mart Fraud: जिओ मार्टला लावला तब्बल 20 लाखांचा चुना; 10 डिलिव्हरी बॉईजवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

jio mart delivery boy fraud case - checkmate times

पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जिओ मार्ट कंपनीकडून (Jio Mart Company) ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना न देता त्या परस्पर विकून कंपनीची 20 लाख 70 हजार 716 रुपयांचा अपहार (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया

हा प्रकार शिवणे (Shivane) येथील अगरवाल गोडावूनमध्ये (Agrawal Godown) जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान घडला. याबाबत विनोद तात्या राखे (वय 27, रा. चिंबळी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. 135/23) दिली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Waraje Malwadi Police) डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या 10 जणांवर गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

डिलिव्हरी प्लस (Delivery Plus) कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे महेश सोनवणे (Mahesh Sonawane), मयुर कडु (Mayur Kadu), प्रशोत कांबळे (Prashot Kamble), आदित्य वाघमारे (Aditya Waghmare), अभिषेक साठे (Abhishek Sathe), अनंत करचे (Anant Karche), ललित शिंदे (Lalit Shinde), राज गुप्ता (Raj Gupta), महादेव कांबळे (Mahadev Kamble), सिद्धांत मराठे (Siddhant Marathe) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डिलिव्हरी प्लस (Delivery Plus) ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतून जिओ मार्ट कंपनीकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तु ग्राहकांना पोहोच केल्या जातात. त्यासाठी अनेक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याकडील 10 डिलिव्हरी बॉयने गोडावूनमधून वस्तू घेतल्या. परंतु त्या ग्राहकांना पोहोच न करता दुसर्‍या ग्राहकांला विकल्या. त्याचे पैसे ऑफिसमध्ये जमा न करता 19 लाख 72 हजार 716 रुपयांच्या वस्तू आणि 98 हजार रुपये रोख असा एकूण 20 लाख 70 हजार 716 रुपयांचा अपहार केला. पोलीस उपनिरीक्षक जवळगी (Sub-Inspector of Police Jawalagi) तपास करीत आहेत.

हेही वाचा - Pune Crime: हॉटेलच्या चेन असलेल्या व्यावसायिकाचा सप्लायर्सला तब्बल ७३ लाखांचा गंडा

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.