कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): तब्बल 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महापालिकेच्या रुग्णालयात (Government Hospital) नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन महिन्यांपूर्वी केवळ एकच अतिदक्षता विभाग (Intensive Care Unit) सुरू करण्यात आला आहे. आयसीयूचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असून, आता रुग्णांकडून डिपॉझिटची मागणी केल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने या वृत्तास नकार दिला आहे. ही बातमी आहे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची. (PMC’S Kamala Nehru Hospital)
येथील आयसीयू खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. तपासण्यांपासून उपचारांपर्यंत सर्वत्र नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आयसीयूसाठी सीजीएचएसहून 1 टक्का कमी दर आकारले जात असले, तरी एका दिवसाचे शुल्क 4 हजार ते 5 हजार रुपये इतके आहे. रात्री-अपरात्री रुग्णांना तातडीने अॅडमिट होण्याची गरज भासल्यास 40 हजार रुपये डिपॉझिट मागितले जात असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.
महापालिकेने आरोग्य सेवांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. गरीब रुग्णांची ससेहोलपट थांबविण्यासाठी आयसीयूमधील ठरावीक खाटांचे हक्क महापालिकेने स्वत:कडे राखीव ठेवावेत, अशी अपेक्षा आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी ’चेकमेट टाईम्स’शी बोलताना व्यक्त केली. खासगी संस्थेशी केलेल्या करारनाम्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा -
कमला नेहरू रुग्णालयापाठोपाठ शिवाजीनगरमधील डॉ. दळवी प्रसूतिगृह (Dr. Dalvi Maternity Hospital) आणि माळवे दवाखाना (Malwe Hospital) येथे आयसीयू सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. मात्र, सीजीएचएसहून 1 टक्का कमी दराने आयसीयूचे दर ठरविल्याने निविदांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे (Assistant Health Officer Dr. Sanjeev Vawre) यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84