कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 25, 2023
जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणाऱ्या अधिवेशनाची अंमलबजावणी कधी झाली?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #intellectualproperty @WIPO
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): तीव्र उतार हे दरी पुलावरील अपघातांचे प्रमुख कारण आहे. तो कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (National Highway Authority Of India - NHAI) दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्याला पाच ते सहा वर्षेही लागू शकतात. त्याची प्रतीक्षा करण्यात काही अर्थ नसल्याने पोलीस यंत्रणाच पुढाकार घेऊन ‘शॉर्ट टर्म’ उपाययोजना हाती घेत आहे.
“अपघात रोखण्यासाठी आमच्या अधिकारात उपाय शक्य आहेत, तेवढे आम्ही करू.” असे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना स्पष्ट केले.
“दरीपुलाचा तीव्र उतार हा स्ट्रक्चरल प्रश्न आहे. तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्या अखत्यारित्या येतो. तो कमी केल्याशिवाय अपघात घटणार नाहीत. या संदर्भात दोन्ही यंत्रणांशी चर्चा केली जाईल. जनजागृती, तज्ज्ञांचा सल्ला, चेकिंग पोस्ट, सामाजिक संस्थांचे मार्गदर्शन, पेट्रोलिंग अशा तातडीच्या उपाययोजना आम्ही हाती घेत आहोत. ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, वारजे पोलीस यांच्यात समन्वय ठेवणार आहोत. सध्या तरी आम्ही तीन पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेचे मिळून वीस कर्मचारी पेट्रोलिंग, चेक पोस्टिंग आणि जनजागृतीसाठी देण्याचा विचार करत आहोत.” असे आयुक्त म्हणाले.
दरी पुलावरील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन डिसेंबर 2020 मध्ये कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गाचे (Katraj-Dehu Road Bypass Highway) सलन दोन दिवस वाहतूक शाखेने निरीक्षण केले होते. हे अपघात टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनांची रुपरेषा यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास देण्यात आली होती. त्यानुसार कात्रज बोगदा संपतो तेथून काही मीटर अंतरांवर रेखांकन आणि पूल संपेपर्यंत ब्लिंकर्स टाकण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात टाळण्याचे आणि सावधानतेचे फलक लावले गेले आहेत. पण, तरीही या भागात सातत्याने अपघात होत आहेत.
दरी पुलावर तीव्र उतार असल्याने वाहने वेगाने येतात. बहुतांश अपघात जड वाहनांमुळे असल्याचे आढळले. अवजड वाहनांमुळे अपघाताची तीव्रता, जीवितहानी वाढते. तसेच अचानक सेवा रस्त्यावरुन वाहन समोर आल्यास जड वाहनांचा ब्रेक लागत नाही. पेट्रोल बचतीसाठी गाडी न्युट्रलवर ठेवणे हेही अपघाताचे कारण सांगितले जात आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84