Type Here to Get Search Results !

Khadakwasla: संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Khadakwasla Project Canal Advisory Committee Meeting chandrakant patil - checkmate times

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): “यंदाच्या पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही.” असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. यावेळी पालकमंत्री म्हणाले कि,”यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.”

“पुणे शहरासाठी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.” असेही पाटील म्हणाले.

खडकवासला प्रकल्पातील (Khadakwasla project Dams) 4 धरणात मिळून 25 एप्रिलपर्यंत 11.61 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी 1 मे 2023 ते 15 जून 2023 पर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले आहे. पुणे महानगरपालिकेसाठी 15 जुलै 2023 पर्यंत 4.53 टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा -

बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

 

(MP Vandana Chavan, Former State Minister MLA Dattatray Bharne, MLA Madhuri Misal, Rahul Kul, Bhimrao Tapkir, Ashok Pawar, Sanjay Jagtap, Ravindra Dhangekar, Pune Municipal Commissioner Vikram Kumar, Collector Dr. Rajesh Deshmukh, Krishna Khore, Development Corporation Executive Director Atul Kapole, Chief Engineer Hanumant Gunale, Superintending Engineer Sunanda Jagtap)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.