Type Here to Get Search Results !

Khed APMC Election: भाजपा, शिंदे गट आणि ठाकरे गट युती करून लढवणार पुणे जिल्ह्यातील या जागेची महत्वपूर्ण निवडणूक

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

khed bajar samiti election - checkmate times

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Khed Bjaar Samiti) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (NCP MLA Dilip Mohite) यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना शिवसेनेचीही (शिंदे) साथ मिळाली आहे. येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे सहा दिवस मिळणार आहेत.

खेड तालुक्यावर (Khed) आमदार मोहिते यांचे 2004 पासून कायम वर्चस्व राहिले आहे. मोहितेंविरुद्ध त्यांचे सगळे विरोधक एकत्र येऊनही ते विधानसभेसह जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहेत. मात्र, 2014 चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना त्यात यश आलेले नाही.

अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी (दि. 20 एप्रिल 2023) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणुकीतून 125 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank - PDCC) निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे-पाटील यांच्याप्रमाणे आमदार मोहिते हे बिनविरोध निवडून आले. त्यावेळी, मात्र हे आता एकवटलेले विरोधक का एकत्र आले नव्हते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आमदार मोहितेंच्या भीमाशंकर सहकारी पॅनेलमध्ये जुन्यांबरोबर नव्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. गतवेळी त्यांच्या विरोधकांना बाजार समितीत चार जागा मिळाल्या होत्या. यावेळी, मात्र परिवर्तन होणार असल्याचा दावा आमदार मोहितेंच्या विरोधकांनी केला आहे. परिवर्तनाची नांदी सुरु झाल्याचे त्यांच्याविरुद्धच्या ठाकरे गट, शिवसेना आणि भाजपच्या भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनेलचे आधारस्तंभ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख (Former Zilla Parishad Member Atul Deshmukh) यांनी 'चेकमेट टाईम्स'ला सांगितले.

हेही वाचा -

शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि परिवर्तन पॅनेलचे एक उमेदवार भगवान पोखरकर (Bhagwan Pokharkar) यांनीही यावेळी बदल होईल, असा दावा केला आहे. तर, यापूर्वीही आपले सारे विरोधक झाडून एकत्र आले होते. त्याचा काहीही फायदा झाला नाही. यावेळी पुन्हा बाजार समितीत शंभर टक्के आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite) यांनी 'चेकमेट टाईम्स'शी बोलताना केला.

आमदार मोहिते यांच्या विरोधातील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व लक्ष्मण टोपे (Laxman Tope), भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील (Sharad Butte Patil), अतुल देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले (BJP taluka president Shantaram Bhosale), शिवसेनेचे पोखरकर, ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड (Ashok Khandebharad of Thackeray Shiv Sena), रामदास धनवटे, अमोल पवार, संजय घनवट तसेच विजय शिंदे नेतृत्व करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.