कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 8, 2023
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #india #award #civilianaward @mygovindia
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जु्न्नर बाजार समितीमध्ये निवडणूकीच्या (Bajar Samiti Election) रिंगणात उभा असलेल्या एक उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. (Pune Crime News)
किशोर कोंडिभाऊ तांबे (वय – 40) (Kishore Kondibhau Tambe) असे मृत्यू झालेल्या आणि बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी त्यांच्या घराशेजारी असलेल्या विहीरीमध्ये हा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Checkmate:
क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, काल रात्री शेतात चालल्याचे सांगून सदर उमेदवार घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांचा काहीच शोध लागत नसल्यामुळे आळेफाटा पोलीसांत (Aalephata Police) बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांकडून करण्यात आली. पोलिसांनी अजून ही तक्रार नोंदवून घेतलेली नसून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रात्रभर शोधकार्य सुरु असताना आज दुपारच्या सुमारास घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला आहे. हात पाय बांधून पोत्यात भरून पोत्याला दगड लावून त्यांचा मृतहेद विहिरीत टाकण्यात आला होता. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी उमेदवाराची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Crime news)
मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने यामागे राजकारण आहे का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. किशोर यांनी बाजार समिती निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठी कंबर कसली होती. परंतु अशा प्रकारे त्यांचे निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - Baramati Loksabha | निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज रहा; पुरंदर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची बैठक
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84