Type Here to Get Search Results !

Bajar Samiti Election: दौंड मध्ये राष्ट्रवादीने दिली 18 पैकी 17 नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीची उमेदवारी

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

krishi bajar samiti election daund - checkmate times

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Krushi utpanna bajar samiti nivadnuk) 18 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या 18 उमेदावारांची (Cabdidates) यादी जाहीर करण्यात आली आहे. (Pune Politics)

दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात (Senior Director of Pune District Central Cooperative Bank Ramesh Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून सर्व 18 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार (Nationalist Congress Party Taluka President Appasaheb Pawar) यांनी दिली.

पक्षाने मागील 19 संचालकांपैकी फक्त व्यापारी मतदारसंघातील एका संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पक्षाने 18 जागांसाठी तब्बल 17 नव्या लोकांना संधी देत भाकरी फिरविली आहे. राष्ट्रवादी पक्षाने बाजार समितीचे माजी उपसभापती संपत निंबाळकर (Sampat Nimbalkar, former vice-chairman of the market committee) यांना आडते व व्यापारी मतदारसंघातून पु्न्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी सभापती, उपसभापती व संचालकांना पुन्हा संधी नाकारली आहे.

शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे.


सहकारी सोसायटी मतदारसंघ :-

सर्वसाधारण - कल्याण पवार, संतोष वरघडे, गजिनाथ आटोळे, आत्माराम ताकवणे, अजित शितोळे ,सचिन शेळके, विष्णू सूर्यवंशी,

महिला राखीव - वर्षा मोरे, गितांजली शिंदे,

भटक्या विमुक्त जाती जमाती - बाळासाहेब शिंदे,

इतर मागासवर्ग - जीवन म्हेत्रे.


ग्रामपंचायत मतदारसंघ:-

सर्वसाधरण - संतोष तापकीर, संभाजी खैरे,


आर्थिक दुर्बल मतदारसंघ - उत्तम टेमगिरे,


अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघ - राजेश सोनवणे.


आडते व व्यापारी मतदारसंघ - संपत निंबाळकर व सुनील निंबाळकर.


हमाल मतदारसंघ - पोपट शेंडगे.

नोव्हेंबर 2016 मध्ये पार पडलेल्या दौंड बाजार समिती निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल सर्व 19 जागा, राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेल सर्व 18 जागा तर भाजप व रिपाईं (आठवले गट) पुरस्कृत शेतकरी सेवा पॅनेलने 11 जागा लढविल्या होत्या. मात्र शेतकरी विकास पॅनेलने सर्व 19 जागा 359 ते 300 मतांच्या फरकाने जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. यंदा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप पुरस्कृत पॅनेल यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.

हेही वाचा -

(Kalyan Pawar, Santosh Varaghde, Gajinath Atole, Atmaram Takwane, Ajit Shitole, Sachin Shelke, Vishnu Suryavanshi, Varsha More, Gitanjali Shinde, Balasaheb Shinde, Jeevan Mhetre, Santosh Tapkir, Sambhaji Khaire, Uttam Temgire, Rajesh Sonwane, Sampat Nimbalkar, Sunil Nimbalkar, popat shendge)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.