Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शिंदेवाडी (Shindewadi) (ता. भोर) आणि श्रीरामनगर (Shriramnagar) (ता. हवेली) येथील गोडाऊनमध्ये पोलिसांनी रविवारी (दि. 2 एप्रिल 2023) पहाटे टाकलेल्या छाप्यात सुमारे 56 लाख रुपयांचा गुटखा जप्त (Tobacco seized) करण्यात आला. (Pune Crime News)
याप्रकरणी रमेश मोतीलाल चौधरी (Ramesh Motilal Chaudhary) (वय 37, रा. श्रीरामनगर, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
राजगड पोलिसांना श्रीरामनगर येथील एका दुकान व्यावसायिक बेकायदा गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानुसार राजगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे श्रीरामनगर येथील किराणा दुकान व्यावसायिकाच्या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी तेथे विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू याचे बॉक्स आणि पोती आढळून आली.
यावेळी संबंधित दुकानदाराकडे चौकशी केली असता त्याचे शिंदेवाडी येथे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिंदेवाडी येथेही छापा टाकला. तेथेही मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली. पोलिसांनी दोन्ही गोडाऊनमधील सुमारे 56 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि एक मोटारगाडी जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी रमेश चौधरी याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ही कारवाई रविवारी पहाटे केली असली तरी प्रत्यक्ष गुन्हा रात्री उशिरा नोंद झाला. कारण अन्न व औषध प्रशासन विभागास कळवूनही मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगून त्यांच्याकडून याबाबत फिर्याद देण्यास तसेच पंचनामा करण्यास कोणीही आले नाही. त्यामुळे सदर प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास वेळ लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Rajgad Police Inspector Sachin Patil), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (Police Inspector Avinash Shilimkar of Local Crime Branch), सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (Assistant Police Inspector Manoj Kumar Navsare), पोलीस हवलदार संतोष तोडकर (Police Constable Santosh Todkar), राहुल कोल्हे (Rahul Kolhe), महादेव शेलार (Mahadev Shelar), सागर गायकवाड (Sagar Gaikwad), अजित भुजबळ (Ajit Bhujbal) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - सोलापूर रस्त्यानंतर नाशिक रस्त्यावर देखील अफूच्या शेतीचे फॅड; एक शेतकरी गजाआड
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84