Type Here to Get Search Results !

Panshet Leopard: पानशेतच्या दुर्गम भागात बिबट्याची दहशत सुरूच; गाई, म्हशींच्या कळपावर हल्ला करून केली गाईची शिकार

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime,  Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

leopard attack at panshet - checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): अतिदुर्गम पानशेत धरण (Panshet Dam) भागात बिबट्यांचा (Leopard Attack) धुमाकूळ सुरूच आहे. टेकपोळे येथील आंब्याचा दांड धनगरवस्ती (Dhangarvasti) जवळील जंगलात सायंकाळी एका धष्टपुष्ट बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जागीच गाईचा फडशा पाडला.

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे; सोशल मिडीयावर नागरिकांच्या प्रतिक्रिया

गंगाराम लक्ष्मण ढेबे (Gangaram Lakshman Dhebe) या वृद्ध गुराख्याने प्रसंगधानता दाखवत तेथुन पळ काढला त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. रायगड (Raigad) व पुणे (Pune) जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर आंब्याचा दा़ंड धनगरवस्ती आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गंगाराम ढेबे हे जनावरे घेऊन घराकडे निघाले होते. त्यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने जनावरांच्या कळपावर हल्ला केला. कळपातील वासरे, बैल, गाई सैरावैरा पळत सुटली. त्यावेळी बिबट्याने एका गाईच्या मानेवर जोरदार हल्ला केला. गाय हंबरडा फोडत काही क्षणात निपचित पडली. गंगाराम ढेबे यांच्या समोरच बिबट्याने गाईचा फडशा पाडला. गाईची सुटका करण्यासाठी आरडाओरडा करत गंगाराम पुढे आले मात्र बिबट्याचे अक्राळविक्राळ रूप पाहून ते तेथुन धावत घरी आले.

पानशेत वनविभागाचे वनरक्षक एस. बंगाळ (Forest Guard of Panshet Forest Department S. Bengal) म्हणाले,”घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात येणार आहे.”

तोरणा घिसर (Torna Ghisar) पाठोपाठ पानशेत धरण भागातील रायगड जिल्ह्यालगतच्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने गुराखी, शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. घनदाट जंगलातील दुर्गम भागात घटनास्थळी जाण्यासाठी थेट रस्ते नाहीत तसेच मोबाईल फोनला रेंजही नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग, वनविभागाला मुख्य रस्त्यापासून पाच ते दहा किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे.

तसेच वेळेवर पंचनामे, शवविच्छेदन तसेच शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे शेतकऱ्यांना गैरसोयीचे होते. त्यामुळे अतिदुर्गम भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने शासन निर्णयानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - Viral Video: पुण्यात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश; न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी मध्ये सकाळी सकाळी घुसला होता बिबट्या

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.