Type Here to Get Search Results !

Liquor: खडकवासला धरणात हातभट्टी दारूचे उत्पादन; पाटबंधारे खाते करतेय काय?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

liquor stock found near khadakwasla dam - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाण्याला अगदी लागून कच्च्या गावठी दारुने भरलेले तब्बल चाळीस पेक्षा जास्त प्रत्येकी दोनशे लिटरचे बॅरल आढळून आले आहेत. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत पुणे-पानशेत रस्त्यापासून (Pune - panshet Road) केवळ पन्नास ते शंभर मीटर अंतरावर खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेने डोंगर कपारीत गाडलेला कच्च्या दारूचा साठा आढळून आला आहे. तेथे कच्च्या गावठी दारुचा साठा असलेले एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस बॅरल आहेत व आणखी असण्याची शक्यताही दर्शवली जात आहे. ओसाडे येथे आढळलेला गावठी दारुचा साठा (Liquor Stock) हा तब्बल आठ हजार लिटरपेक्षा जास्त आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आजुबाजूच्या सर्व गावांमध्ये येथू गावठी दारुचा पुरवठा करुन विक्री केली जाते. तसेच येथील गावठी दारुचा शहरातही पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी अनेक वर्षांपासून राजरोसपणे गावठी दारुची भट्टी सुरू असून पोलीसांना याबाबत माहिती असताना 'जाणीवपूर्वक' कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळी अगदी पाण्याला लागून दारु उकळण्याचे काम सुरू असते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ही दारुची भट्टी आहे तेथील परिसरात कुजलेल्या कच्च्या दारुची उग्र दुर्गंधी (smell) येत आहे. तसेच धरणाच्या पाण्यात व कडेने कोळशांचा खच पडलेला आहे. सांडलेले कच्च्या दारुचे रसायन, इतर घाण ही थेट पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत (raw liquor mixing in khadakwasla dam water) आहे.(Pune Crime News)

या दारु विक्रेत्यांची परिसरात दहशत असल्याने व पोलीसही त्यांना सामील असल्याने आजपर्यंत भीतीपोटी आम्ही कोणालाही सांगितले नाही अशी माहिती स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

तसेच आता हा एवढा गंभीर प्रकार पोलीसांच्या इतके दिवस कसा लक्षात आला नाही? पोलीसांना माहिती असेल तर कारवाई का झाली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हेही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये 'कोणकोण' सामील आहे हे आता तपासातून बाहेर येते की खडकवासला धरणाच्या पाण्यात या भट्टीतून मिसळलेल्या घाणीसारखेच तपासही हरवून जातो हे पाहणे गरजेचे आहे.(Pune Crime News)

याप्रकरणी विचारले असता वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार (Assistant Police Inspector of Velhe Police Station Manoj Pawar) यांनी सांगितले कि,"तातडीने संबंधित ठिकाणी पोलीसांची टिम पाठविण्यात आली असून कच्च्या गावठी दारुचा साठा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. नागरिक जरी आरोप करत असले तरी याबाबत आम्हाला अगोदर माहिती नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार आहे."

हेही वाचा - हातभट्टी दारू पिल्याने 4 महिन्यात 5 जणांचा मृत्यू; कडक कारवाई करण्याची भाजपा शहर उपाध्यक्षांची मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.