Type Here to Get Search Results !

Crime: बालसुधारगृहातून बाहेर आल्यावर प्रेयसीवर केले 22 वार; प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीनांचा खतरनाक कारनामा

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

love traingle murder in chikhali - checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): दुसर्‍या तरुणासोबतचा फोटो पाहून बावीस ठिकाणी घाव घालून मुलीचा खून (murder) केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने दिली आहे. ओठावर मिसरूड न फुटलेल्या दोन मुलांनी केलेला कारनामा ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. (Pune Crime)

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे; सोशल मिडीयावर नागरिकांच्या प्रतिक्रिया  

ही घटना चिखली (Chikhali) येथे घडली. घटना उघडकीस आल्यानंतर चिखली पोलिसांनी काही तासांच्या आत दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपीचे वय 17 तर दुसर्‍याचे वय अवघे 14 वर्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेला 17 वर्षीय आरोपी मुलगा आणि मृत मुलगी एकाच शाळेत शिक्षण घेत होते. सन 2020 मध्ये त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान, काही दिवसांतच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सन 2022 मध्ये मुलगी गरोदर राहिली; मात्र त्या वेळी आरोपी मुलाने लग्नास नकार दिल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचा गुन्हा दाखल करून मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली.

दरम्यान, मागील तीन महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा बाल सुधारगृहातून (juvenile home) बाहेर आला होता; मात्र तोपर्यंत मुलीचे दुसर्‍याशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्यानंतर मुलगी आरोपी मुलाकडे बघतही नव्हती. दरम्यान, मुलीने आरोपी मुलास असूया उत्पन्न होण्याच्या उद्देशाने आपले नवीन प्रियकरासोबतचे फोटो दाखवल्यामुळे आरोपी मुलगा वैतागला होता.

त्याने आपल्या साथीदाराला हा प्रकार सांगितला. दोघांनी मिळून 1 एप्रिल 2023 रोजी मुलीला फोन केला. थोरली बहीण आजारी असल्याने मुलीच्या घरचे तिला रुग्णालयात घेऊन जाणार असल्याने ती घरात एकटीच होती. त्यामुळे संध्याकाळी भेटण्याचे ठरले. तिघेजण चिखली परिसरातील एका पडक्या इमारतीत भेटले. आरोपी मुलगा आणि मुलगी चालत असताना साथीदाराने ठरल्याप्रमाणे पाठीमागून मुलीवर वार केला. मुलगी खाली कोसळताच मुलाने तिच्या डोक्यात, खांद्यावर, हातावर, पोटात कोयत्याने तब्बल बावीस वार केले. त्यानंतर मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोघेही घरी निघून आले.

या गुन्ह्यातील आरोपी मुलाचे वय 17 वर्ष इतकेच असले तरी त्याच्यावर खून (murder), खुनाचा प्रयत्न (Attempt to murder), बलात्कार (Rape) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, त्याचा साथीदार असलेल्या 14 वर्षीय मुलावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपींनी कमी वयातच मोठे कांड केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - Pune Crime | एका बुक्कीत जीव घालवीन हा प्रचलित शब्द खरा ठरला; निष्पाप रिक्षाचालक जीवानिशी गेला

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.