कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
पुण्यातली संभाव्य लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का?उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #byelection #pune— Checkmate Times (@checkmate_times) April 5, 2023
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 5 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जी-20 जागतिक संमेलनाचे (India G20 Presidency) यजमानपद सध्या भारत भूषवित आहे. याच अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण (Woman Finanacial Empowerment) आणि लिंगसमानता (Gender Equality) या महत्वाच्या विषयांवर जागरण व्हावे, याकरिता ‘W20 (Women 20)’ या समूहाची निर्मिती 2015 मध्ये झाली होती. यात G-20 देशांमधील महिला उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील महिला नेतृत्वाचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणाचा महत्वपूर्ण विषय ‘जी-20’च्या पटलावर केंद्रस्थानी यावा, हे डब्ल्यू 20 चे मुख्य उद्दिष्ट आहे.
भारतामधील डब्ल्यू 20 समूहामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधि (Education Department) म्हणून SNDT महिला विद्यापीठाचा (SNDT Woman’s University) समावेश झालेला असून या विद्यापीठाने डब्ल्यू 20 परिषदेच्या आयोजनामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची (Maharshi Karve Stree Shikshan Sanstha)निवड केली आहे. त्यानुसार संस्थेच्या ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (नऱ्हे) (School Of Fashion Technology, Narhe) या ठिकाणी डब्ल्यू 20 च्या भारतीय प्रतिनिधींची ही परिषद दि. 7 व 8 एप्रिल 2023 रोजी संपन्न होत आहे.
उद्योग, सामाजिकता, शैक्षणिक इ. विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या भारतातील एकूण 150 मान्यवर महिला प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’च्या प्राचार्या डॉ. मंजू हुंडेकर (Principal of School of Fashion Technology Dr. Manju Hundekar) या डब्ल्यू 20 परिषदेच्या प्रमुख संयोजिका आहेत.
सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग, आर्थिक निर्णयांत महिलांचा अंतर्भाव, महिला आणि तंत्रज्ञान, महिला आणि डिजिटल कौशल्ये या विषयांवर डब्ल्यू 20 (भारत) समूह प्रामुख्याने चिंतन करणार असून जी 20 जागतिक पटलावर महिलाविषयक धोरण ठरविण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होणार आहे.
या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) हे उपस्थित राहणार असून, SNDT महिला विद्यापीठ (मुंबई) च्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव (Vice-Chancellor of SNDT Women's University (Mumbai) Dr. Ujjwala Chakradev), महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव (Ravindra Dev, Executive President of Maharshi Karve Women's Education Institute), महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या कुलगरू डॉ. माधुरी कानिटकर (Chancellor of Maharashtra University of Health Sciences Dr. Madhuri Kanitkar), SNDT महिला विद्यापीठ (मुंबई) च्या प्र-कुलगुरू रुबि ओझा (Ruby Ojha, Pro-Chancellor of SNDT Women's University (Mumbai)) हे उपस्थित राहतील.
तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी (Vidya Kulkarni, Vice President of Maharshi Karve Women's Education Institute), संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री (Secretary of the organization Dr. P. V. S. Shastri) आणि परिषद संयोजिका डॉ. मंजू हुंडेकर हे मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती रवींद्र देव, डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, डॉ. मंजू हुंडेकर यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.
हेही वाचा - प्रत्येक संकटातून पुन्हा उभे राहण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा– चारुदत्त आफळे
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84