कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
राजकारणामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे का?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational,, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): अध्यात्मिक संशोधनातून (Spiritual Research) असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यसनांची 30 टक्के कारणे शारीरिक असतात, म्हणजे व्यसनाधीन (addiction) पदार्थांवर अवलंबून असतात, तर 30 टक्के मानसिक आणि 40 टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्म शास्त्रानुसार,’योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर कमी कालावधीत मात करता येते. तसेच व्यसनांवर पूर्णपणे मात करण्याचे आध्यात्मिक साधना हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे’, असे ‘महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया’च्या (Maharshi University of Spirituality) वतीने शॉन क्लार्क (Shoun Clark) यांनी सांगितले.
ते डब्लिन आयर्लंड (Dublin, Ireland) येथे नुकतेच ‘कॉन्फरन्स सिरीज’ने आयोजित केलेल्या 10 व्या ‘अॅन्युअल काँफ्रन्स ऑन मेंटल हेल्थ’ (ACMH 2023) या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘आध्यात्मिक कारणांमुळे व्यसने कशी जडतात आणि त्यावर मात कशी करावी?’ या विषयावर 102 वा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (Founder Satchidananda Parabraham Dr. Jayant Aathvale) हे या शोधनिबंधाचे लेखक, तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटातील शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
यावेळी क्लार्क म्हणाले की,"नकारात्मक शक्तींचा प्रभाव किंवा अतृप्त पूर्वजांमुळे होणारे त्रास हे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात, तसेच ते त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढवण्यात कारणीभूत ठरतात. तथापि, एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक साधना चालू केली की, त्याची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अल्प होऊ लागते. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (UAS) या उपकरणांद्वारे प्रयोग करून काढलेल्या निष्कर्ष या परिषदेत सादर केले."
या प्रयोगांमध्ये फ्रान्समधील (France) एका संतांच्या तीन चित्रांची प्रभावळ मोजण्यात आली. पहिले, साधना चालू करण्यापूर्वी जेव्हा त्यांना सिगारेटचे व्यसन होते. दुसरे, आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर आणि तिसरे, आध्यात्मिक प्रगती करून संत झाल्यानंतरचे होते. यातील निष्कर्षांवरून असे आढळून आले की, ज्या पहिल्या चित्रात त्यांना सिगारेटचे व्यसन होते, त्यात नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोठ्या प्रमाणात आढळली. दुसर्या चित्रात, त्यांची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अर्ध्याने अल्प झाली, तर संत झाल्यानंतर काढलेल्या त्यांच्या तिसर्या चित्रात सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोठ्या प्रमाणात आढळून आली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयामध्ये आध्यात्मिक साधना करून काही महिने किंवा वर्षांमध्ये व्यसनांवर मात केलेल्या साधकांच्या चाचणीची उदाहरणे या वेळी देण्यात आली.
या सर्व प्रयोगांचे निष्कर्ष मांडतांना क्लार्क म्हणाले की,”जर वैद्यकीय समुदायाला समाजाचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या संशोधनात आध्यात्मिक परिणाम समाविष्ट केले पाहिजे आणि त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये आध्यात्मिक साधनांचा वापर केला पाहिजे; कारण मानवाच्या कल्याणासाठी अध्यात्म अत्यंत महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा - दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास व भाविकांची गर्दी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84