Type Here to Get Search Results !

Panshet | पानशेत धरणात बुडून मोहित सराफ याचा दुर्दैवी मृत्यू

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

man drown in panshet dam- checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पानशेत परिसरात (Panshet Dam Backwater) एक तरूण पाण्यात उतरला आणि बुडून मृत्यू पावल्याची घटना शुक्रवारी (दि. 7 एप्रिल 2023) रात्री घडली. मोहित हेमंत सराफ (Mohit Hemant Saraf) असे मयत तरुणाचे नाव आहे. पानशेत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मुळशी आपत्ती निवारण टीमच्या (Disaster Management Team) सदस्यांनी पाण्यात शोधून काढला.

वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य तानाजी भोसले (Tanaji Bhosale, a member of the Wildlife Rescue Team) म्हणाले,”पानशेत बॅकवॉटरमध्ये सात ते आठ जणांच्या तरूणांचा ग्रुप रात्री मुक्कामी होता. त्यातील एकालाही पोहता येत नव्हते. बरेच विद्यार्थी परराज्यातील होते. जो तरूण गेला तो सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, मध्यप्रदेशचा होता. तो मुलगा पाण्यात पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन आला. त्यांनी आम्हाला कळवले आणि आम्ही तत्काळ घटनास्थळी पोचलो. रात्र खूप झाल्याने आणि पाणी खोल असल्याने आम्ही सकाळी रेस्क्यू करायचे ठरवले. त्यानंतर सकाळी येऊन क्यूबा डायव्हिंगवाल्यांनी 10 मिनिटांत मृतदेह बाहेर काढला.”

रेस्क्यू करणाऱ्या टीममध्ये मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे (Pramod Balkawade), ऋषिकेश शिवतरे (Rushikesh Shivtare), हनुमंत नवले (Hanumant Navale), आबाजी जाधव (Aabaji Jadhav), राजू प्रधान (Raju Pradhan), निखिल (Nikhil) यांचा समावेश होता.

सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्याने अनेकजण फिरायला खडकवासला, पानशेत परिसरात जात आहेत. त्यांना पाण्यात जाण्याचा मोह आवरत नाही. परंतु, पाण्याची खोली कळून येत नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका आहे. याविषयी अनेकदा जलसंपदा विभागाकडून पाण्यात उतरू नये म्हणून आवाहन करण्यात येते. तरी देखील तरूण-तरूणी व नागरिकही पाण्यात जाऊन खेळताना दिसून येतात.

''पानशेतच्या बॅकवॉटरमध्ये अनेक ठिकाणी खोल पाणी आहे. तसेच भोवरे देखील आहेत. त्या भोवऱ्यात पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बाहेर येता येत नाही. भोवऱ्यात एकदा अडकले की, जीवच जातो. त्यामुळे नागरिकांनी बॅकवॉटरमध्ये जाऊच नये.” असे तानाजी भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा - धरणावर पार्टी करायला जाणे बेतले जीवावर; पोहता येत नसल्याने एकाचा बुडून मृत्यू

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.