कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-पुण्यातली संभाव्य लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का?उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #byelection #pune— Checkmate Times (@checkmate_times) April 5, 2023
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 5 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्ता (Balbharti to paud phata road) करण्याच्या पुणे महापालिकेच्या (PMC) प्रस्तावावर भाजपमध्येच एकमत नसल्याचे समोर आले आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) या रस्त्यासाठी सकारात्मक असताना माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni) यांनी सोमवारी महापालिका प्रशासकांना भेटून थेट रस्त्यालाच विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासन काही अंशी बुचकळ्यात पडल्याची स्थिती आहे.
कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्याला (senapati bapat road) जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्ता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामाला पर्यावरणप्रेमींचा वाढता विरोध लक्षात घेऊन 28 मार्च 2023 ला आमदार शिरोळे, माजी महापौर मोहोळ, महापालिकेचे अधिकारी आणि तेथील नागरिकांनी एकत्रितपणे प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली होती.
त्या वेळी शिरोळे आणि मोहोळ यांनी “नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची नोंद प्रशासनाने घेतली असून, यापुढेही नागरिकांसोबत चर्चा सुरू राहील. त्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढण्यात येईल,” असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा - पौड फाटा ते बालभारती रस्त्याचा खर्च वाढता वाढता वाढे; घेई कोटीच्या कोटी उड्डाणे
तर पालकमंत्री चंद्रकात पाटील (Guardian Minister Chandrakat Patil) यांनी मध्यंतरी महापालिकेच्या प्रश्नांसंदर्भात नुकतीच शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी ‘पर्यावरणप्रेमींनी रस्त्याबाबत टोकाची भूमिका घेऊ नये,’ असे आवाहन केले होते. असे असताना आज माजी आमदार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन थेट रस्त्याच्या कामाला विरोध केला.
“हा रस्ता सध्या पुण्याचा प्राधान्यक्रम नसून, पर्यावरण व टेकड्या वाचविण्याला प्राधान्य असावे. या रस्त्यासंदर्भात सर्व तज्ज्ञांचे निष्कर्ष प्राप्त झाले असून, रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्याला आमचा विरोध आहे,” असे निवेदन त्यांनी प्रशासकांना दिले.
कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात कर्वे रस्त्यावरील उड्डाण पूल फसल्याचा आरोप केला आहे. “एकीकडे मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. असे असताना मेट्रोच्या मार्गावर कर्वे रस्त्यावर उड्डाण पूल करून वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला. तो प्रयत्नही फसला. एका मोठ्या चौकातील गर्दी दुसऱ्या छोट्या चौकात सरकवली एवढेच झाले.” असेही त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
हेही वाचा - दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आम आदमी पार्टीचे खुले पत्र
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84