Type Here to Get Search Results !

Pune Crime: तुमच्या दुकानाच्या दारात झोपलेला भिकारी नक्की कोण आहे?; भिकाऱ्याच्या वेशातील चोराने दुकान फोडले

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

theft in mobile shop pune crime - checkmate times

पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भिकार्‍याचा वेष धारण करून मोबाईल शॉपी फोडणार्‍या एकासह मोबाईल विकत घेणार्‍या दोघांना लष्कर पोलिसांनी (Lashkar Police) बेड्या ठोकल्या. या घटनेत चोरी (Theft) केलेल्या 18 लाखांच्या मोबाईलपैकी साडेनऊ लाखांचे मोबाईल पोलिसांकडून जप्त (Mobile Seized) करण्यात आले आहेत. (Pune Crime news)

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया

लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) मोबाईल शॉपीमालक रितेश श्याम नवले (Ritesh Shyam Navale) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार असीम शब्बीर शाह (वय 23) (Asim Shabbir Shah) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तर चोरीचा मोबाईल विकत घेतल्याप्रकरणी केदार शिंदे (Kedar Shinde) यालाही अटक केली आहे. चोरीची घटना 22 जानेवारी 2023 रोजी घडली. ही घटना महात्मा गांधी रस्त्यावरील (Mahatma Gandhi Road) एका मोबाईल शॉपी मध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानाचे शटर तसेच मेन बिल्डींगचे शटरचे लॉक तोडून दुकानातील सॅमसंग कंपनीचे 18 मोबाईल, एक लॅपटॉप आणि रोख 6 लाख रुपये असा एकूण 18 लाख 10 रुपयांचा माल चोरीस गेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये असिम शाह दुचाकी गाडी दूर अंतरावर पार्क करून भिकार्‍याचा वेष धारण करून दुकानाबाहेर झोपल्याचे दिसले. यानंतर मध्यरात्री दुकानाचे शटर कटावणीने उचकटून त्याने चोरी केली.

चोरीस गेलेले सर्व मोबाईलचे आयएमईआय नंबर ट्रेसिंगसाठी (IMEI Number Tracing) देण्यात आले होते. केदार शिंदे (रा. लोहियानगर) याने चोरीच्या मोबाईलचा वापर केल्याची माहिती प्राप्त झाली. त्याने असीम शहा याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार असिम शहा यांस 1 एप्रिल 2023 ला अटक केली. त्याच्याकडून 9 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 14 मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील (Deputy Commissioner of Police Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त आर. राजे (Assistant Commissioner of Police R. Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे (Senior PI Rajesh Tatkare), पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके (Inspector of Police (Crime) Priyanka Shelke), सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड (API Sheetal Kumar Gaikwad), उपनिरीक्षक कांबळे (Sub Inspector Kamble, मंगेश बोर्‍हाडे (Mangesh Borhade) यांच्या पथकाने केली.

हेही वाचा Pune Crime: पुणे चोरी झालेली मोटार परत मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.