Type Here to Get Search Results !

Pune Crime: हे प्रेमीयुगुल पुण्यातून तिकडे पर्यटनाला जायचे, येताना मोटारसायकल चोरून आणायचे

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी असताना घराचे कर्ज डोक्यावर होते. अशातच एका महिलेशी प्रेम संबंध जोडून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी आणि ऐशो आराम जीवन जगण्यासाठी त्या दोघांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे (Motorcycle theft offences) केले. (Pune Crime news)

पेण, रसायनी, खांदेश्वर याठिकाणी (Pen Rasayani, Khandeshwar) त्यांनी मोटार सायकल चोरल्या आहेत. यातून बंटी आणि बबलीने 2 लाख 13 हजाराच्या दहा मोटार सायकलवर हात साफ केले. अखेर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (Raigad Local Crime Investigation Squad) सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी विक्रम राम कालेकर (वय. 36, मूळ रा. लाडवली) (Vikram Ram Kalekar) याचे आरोपी अनुराधा विवेक दंडवते (वय. 31, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा. 75/4, पर्वती पायथा, स्वारगेट, पुणे) (Anuradha Vivek Dandvate) हिच्याशी प्रेमसबंध होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम रांजणगाव (Ranjangaon) येथील एमआयडीसीमध्ये (Samsung Company, MIDC) समसंग कंपनीत 40 हजार पगाराची नोकरी करीत होता. पुणे येथे कर्जावर घर घेतले होते. घराचे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि एशो आराम जीवन जगण्यासाठी चोरी करण्याचा प्लॅन दोघांनी केला. कंपनीतून सुट्टीच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन (Pen and Rasayani Police Stations) हद्दी मधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे हे दोघे बंटी बबली करायचे. महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा.

ज्या परिसरात चोरी करायचे आहे त्या परिसरात फिरून ज्या मोटरसायकलला चावी आहे अशी मोटरसायकल चोरी करून पसार व्हायचे.

या बंटी बबली चा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे पथकाने शोध सुरू केला होता. यासाठी सीसीटिव्ही च्या आधारे तपास सुरू केला. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे Police Constable Rakesh Mhatre) यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार नुसार पथकाने रसायनी येथे सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी विक्रम कालेकर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी गुन्हा कबूल केला.

हेही वाचा -

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे District Superintendent of Police Somnath Gharge), अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे (Upper Superintendent of Police Atul Zende) याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे Police Inspector Dayanand Gawde of Local Crime Investigation Department) याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम (Sub Inspector of Police Mahesh Kadam), सहाय्यक पोलीस अधिकारी कोरम (Assistant Police Officer koram), पोह मोरे, पोह झेमसे, पोह राजा पाटील, पोह सावंत, पोह म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोना तुषार घरात (Tushar Gharat) व पोना अक्षय पाटील (Akshay Patil) यांनी यशस्वी कारवाई केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.