Type Here to Get Search Results !

Navale Bridge Accident: नवले पूल अपघात प्रकरणात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Navale Bridge Accident checkmate times

पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Banglore National Highway) अपघाताची तीव्रता लक्षात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी सांगितले. ही समिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली.

या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक (Project Director, National Highways Authority of India), सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य (Superintending Engineer Member of Public Works Board) तर प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer) हे सदस्य सचिव म्हणून यांचा समावेश करण्यात आला आहे.

अपघातानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) भेट देऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते (Sub Divisional Officer Sneha Kiswe-Devkate), 'ससून'चे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. यल्लपा जाधव (Medical Deputy Superintendent of 'Sassoon' Dr. Yallapa Jadhav), आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिलेश हराळे (Emergency Medical Officer Dr. Mithilesh Harale), निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश चापे (Resident Medical Officer Dr. Rupesh Chape) आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

“होणाऱ्या अपघाताची कारणे व त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत 'सेव्ह लाईफ फाउंडेशन' या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे.” असे डॉ. देशमुख म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com    

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.