Type Here to Get Search Results !

Baramati Loksabha | बारामती लोकसभा मधील पुरंदर मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुरंदर तालुक्यातील (Purandar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. तसेच, जालिंदर कामठे (Jalinder Ka mathe) व राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आणखी मोठा गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे (Taluka President Gangaram Jagdale) यांनी दिली.

“बारामतीत लोकसभा मतदार संघात भाजपने जशी हालचालीला सुरवात केली, तशा बारामतीच्या खासदार ज्या ठिकाणी गेल्या नव्हत्या, त्या आता गल्ली बोळात फिरू लागल्या आहेत. मोदींजी भारत आत्मनिर्भर करत

आहेत. सत्तेचा वापर सामान्य माणसासाठी करू लागले आहेत. सन 2024 मध्ये पक्ष प्रवेशाचे बाँब फुटतील. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीमुळे हिंदुत्व विसरले आहेत. 25 हजाराचा लोकांचा मेळावा पुरंदरमध्ये घेणार असल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पुरंदरला आणण्याची जबाबदारी माझी,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

नीरा बाजार समितीचे संचालक व सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भानुकाका रामचंद्र जगताप, सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष संतोष एकनाथ जगताप, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन काळुराम पठारे, प्रा. प्रदीप बाजीराव जगताप, संदीप रामचंद्र देवकर, कुंभारवळणाचे माजी उपसरपंच दीपक नामदेव जावळे, पुरंदर तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष बाबू बंडाशेठ नहालवे, पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस किरण देवकर, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव धनंजय सोपान पांगारकर यांच्या समावेश आहे.

तसेच मावडी सुपेचे माजी उपसरपंच बादशाह शेख व सोपान दादा शेंडकर, माजी सरपंच प्रकाश वायकर, मावडीचे माधव चांगदेव शिवरकर, सासवडचे नितीन ताकवले, प्रमोद होले, मावडी पाणलोट समिती सदस्य सुरेश नारायण शिंदे आदींनीही बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

या वेळी नारायण राणे (Narayan Rane), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil), साकेत जगताप (Saket Jagtap), गिरीश जगताप (Girish Jagtap), सचिन पेशवे (Sachin Peshwe), ॲड. शिवाजी कोलते (Adv. Shivaji kolte), जालिंदर जगताप (Jalinder Jagtap), अमोल जगताप (Amol Jagtap), श्‍यामराव लिंभोरे (Shyamrao Limbhore), नाना भामे (Nana Bhame), प्रसाद अत्रे (Prasad Atre), श्रीकांत थिटे (Shrikant Thite), संजयआबा कामठे (Sanjayaaba Kamathe), श्रीकांत ताम्हाणे (Shreekant Tamhane), श्रीकांत राऊत (Shrikant Raut), शिवाजी शेंडकर (Shivaji Shendkar) आदी उपस्थित होते.

Director of Neera Bazar Committee and Saswad Municipal Mayoral Candidate Bhanukaka Ramchandra Jagtap, former President of Saswad City Nationalist Congress Santosh Eknath Jagtap, former Sarpanch of Kumbharvalan Sachin Kaluram Pathare, Sandeep Ramchandra Deokar Prof. Pradeep Bajirao Jagtap, former Deputy Sarpanch of Kumbharvalna Deepak Namdev Jawle, Vice President of Purandar Taluka OBC Cell Babu Bandasheth Nahalve, Purandar Taluka Youth Nationalist General Secretary Kiran Deokar, Taluka Nationalist Youth Congress Secretary Dhananjay Sopan Pangarkar, Former Deputy Sarpanch of Mavadi Supe Badshah Sheikh and Sopan Dada. Shendkar, former sarpanch Prakash Waikar, Madhav Changdev Shivarkar of Mavadi, Nitin Takwale of Saswad, Pramod Hole, Mavadi watershed committee member Suresh Narayan Shinde

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.